हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे ‘श्री खंडेलवाल नवयुवक मित्र
मंडळा’च्या वतीने स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

संस्कारांच्या माध्यमातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे हे आपले कर्तव्य ! –
अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, श्री खंडेलवाल नवयुवक मित्र मंडळ, मुंबई.

खंडेलवाल (वैश्य) नवपरगना समाजासाठी असलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर

भाईंदर (जिल्हा ठाणे) – आज आपल्या हिंदु समाजाला संस्कार शिकवण्याची आवश्यकता आहे. संस्कारांच्या माध्यमातून चांगल्या समाजाची निर्मिती होते़ आणि हे आपल्या सर्वांचे मुख्य कर्तव्य आहे. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो; पण ही विदेशी परंपरा आता आपण पालटली पाहिजे. त्यामुळे आम्ही आता १४ फेब्रुवारीला ‘मातृ-पितृ पूजन’ दिवस साजरा करणार आहोत, त्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जोपासली जाईल. ‘श्री खंडेलवाल नवयुवक मित्र मंडळा’च्या वतीने खंडेलवाल समाज एकत्र येऊन १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ‘मातृ-पितृ दिवस’ साजरा करणार आहे, तसेच या वेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करणार आहोत. ज्या ज्या वेळी समाजकार्याची आवश्यकता असते, त्या त्या वेळी खंडेलवाल समाजाने मोठे योगदान दिले आहे. यापुढेही समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन ‘श्री खंडेलवाल नवयुवक मित्र मंडळा’चे अध्यक्ष अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. ते खंडेलवाल (वैश्य) नवपरगना समाजासाठी दीपावलीनिमित्त आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात उपस्थित समाजबांधवांना संबोधित करतांना बोलत होते. १८ नोव्हेंबर २०१८ या दिवशी खंडेलवाल (वैश्य) नवपरगना समाजासाठी हा स्नेहसंमेलन कार्यक्रम भाईंदर (प) येथील कस्तुरी गार्डन मैदानात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचा ८०० हून अधिक जणांनी लाभ घेतला.

या कार्यक्रमात बोलतांना अधिवक्ता खंडेलवाल पुढे म्हणाले, ‘‘खंडेलवाल (वैश्य) नवपरगना समाजाचे राजस्थानसह पूर्ण भारतभरात १० सहस्र सदस्य असून हा समाज भगवान चारभुजा (विष्णु) यांची भक्ती करणारा आहे. हुंडा प्रथेपासून दूर असलेला, व्यसनमुक्त आणि सात्त्विक असा हा समाज ज्याने देशातील विविध राज्यांत जाऊन राष्ट्रकार्यात योगदान दिले आहे. आता या समाजाने साधना करून समाजसेवा आणि राष्ट्र-धर्मकार्य करण्याचा संकल्प करावा.

या वेळी या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी असलेल्या सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी उपस्थितांना ‘लव जिहाद’ या विषयावर संबोधित केले.

हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

आज आपल्या देशामध्ये समस्त हिंदु जनता जिहादी आतंकवादामुळे त्रस्त झाली आहे. आपल्या हिंदु युवती, माता भगिनी यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहाद’चे भयावह संकट त्रस्त करत आहे. या लव्ह जिहादचे संकट काही नवीन नसून महंमद बीन कासिम, अकबर, अल्लाउद्दीन खिलजी यांच्या काळापासून हा लव्ह जिहाद चालू झालेला आहे. चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री हे आजच्या युवकांचे आदर्श झालेले आहेत; मात्र त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदींविषयी २ ओळी सांगण्यास सांगितले, तर काही सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे; मात्र शाहरुख खान, सलमान खान यांच्याविषयी त्यांना विचारले, तर लगेच सांगतात. या सर्व खानांबरोबर ज्या अभिनेत्री असतात, त्या हिंदू असतात, हे सर्वांत मोठे षड्यंत्र आहे. या ‘फिल्मी जिहाद’ला आपल्या हिंदु मुली बळी पडत आहेत आणि धर्मांध हे हिंदु मुलींना पळवून नेत आहेत. हे धर्मांध वशीकरणाच्या माध्यमातून हिंदु युवतींना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. या संकटांपासून स्वतःला वाचवण्यासाठी हिंदु युवतींनी साधना करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात