(म्हणे) ‘गोव्याच्या सनातन आश्रमात लवकरच ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करणार !’

कॉ. भारत पाटणकर यांचे नेहमीचेच तुणतुणे !

कोल्हापूर – आतापर्यंत मला धमकीची आठ पत्रे आली असून ‘तुम्हाला सोडणार नाही’, अशा आशयाची पत्रे येत आहेत. या पत्रामागे सनातन संस्थेचा हात आहे. (या पत्रांमागे सनातन संस्थेचा हात असल्याचे आतापर्यंतच्या कोणत्याही अन्वेषणातून सिद्ध झालेले नाही. असे असतांनाही धादांत खोटे आरोप करून अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक) ३ मासांपूर्वी धमकीचे पत्र आले असून गोव्याच्या सनातनच्या आश्रमावर लवकरच ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवणार आहे, अशी धमकी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष कॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. या वेळी त्यांच्या पत्नी डॉ. गेल ऑम्व्हेट, अनिल म्हमाणे उपस्थित होते, असे वृत्त ‘न्यूज मराठी २४’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. तसेच या संदर्भात दैनिक पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात ‘अजून सनातनवर बंदी का नाही ?’, असा प्रश्‍न कॉ. पाटणकर यांनी उपस्थित केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात