आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामबैठकीत सनातन संस्थेच्या वतीने ‘ साधनेची आवश्यकता ‘ ह्या विषयावर मार्गदर्शन !

आजरा (जिल्हा कोल्हापूर) येथील
ग्रामबैठकीस युवक आणि महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग

आजरा (जिल्हा कोल्हापूर), २० नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मावर विविध मार्गांनी आघात होत असून देवतांचे विडंबन, संतांना अटक आणि त्यांच्यावर खोटे आरोप, बलपूर्वक धर्मांतर असे प्रकारही होत आहेत. हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. तरी लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले. ते १८ नोव्हेंबर या दिवशी आजरा येथील रवळनाथ मंदिरात झालेल्या ग्राम बैठकीत बोलत होते. या बैठकीसाठी आजरा आणि परिसरातील ७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ युवक आणि युवती, महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी ‘साधनेची आवश्यकता’ याविषयी विशद केली. आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांचा सत्कार श्री. सतीश मोहिते यांनी केला, तर श्री. अमोल कुलकर्णी यांचा सत्कार श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष दोरुगडे यांनी केला. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. या वेळी युवासेना तालुकाप्रमुख श्री. युवराज पोवार, पंडित दिनदयाळ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विजय राजोपाध्ये, भाजपचे श्री. उदय चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. प्रथमेश काणेकर, शिवसेनाविभागप्रमुख श्री. मारुती डोंगरे उपस्थित होते. सभागृहस्थळी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

२५ नोव्हेंबरला बैठक !

साधना, तसेच धर्म या अनुषंगाने कृतीशील होण्यासाठी २५ नोव्हेंबर या दिवशी रवळनाथ मंदिर येथे दुपारी ४ वाजता एकत्र येण्याचे ठरवले आहे.

आभार

सभेसाठी रवळनाथ मंदिर उपलब्ध करून दिल्याविषयी श्री. जितेंद्र टोपले आणि श्री. अनिल कुंभार यांचे, ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिल्याविषयी श्री. उदय चव्हाण यांचे, तसेच बैठक व्यवस्था आणि अन्य साहाय्याविषयी पू. कलावती आई संप्रदायाचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात