‘कोची इंटरनॅशनल बूक फेअर’मध्ये सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला लाभलेला जिज्ञासूंचा प्रतिसाद

कोची (केरळ) – एर्नाकुलम् येथील दर्बार हाल मैदानात २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या ‘कोची इंटरनॅशनल बूक फेअर’मध्ये सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘इंटरनॅशनल बूक फेअर’मध्ये विविध संघटनांच्या ग्रंथप्रदर्शनांचा समावेश आहे.

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात धर्म, अध्यात्म, आयुर्वेद, बालसंस्कार, स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन आदी विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. याशिवाय देवतांची सात्त्विक चित्रे, नामपट्ट्या, तसेच सात्त्विक उत्पादनेही प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. बालसंस्कार, तसचे स्वभावदोष निर्मूलन यांविषयीचे ग्रंथ, पालकांसाठीचे ग्रंथ, तसेच ‘हिप्नोथेरपी’ या विषयावरील ग्रंथ जिज्ञासूंना विशेष भावले.

क्षणचित्रे

१. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी धर्मशिक्षणाचे फलक लावण्यात आले होते. हे फलक वाचून जिज्ञासू ग्रंथप्रदर्शनाला भेट देत होते.

२. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळकक्षालाही अनेक जिज्ञासूंनी भेट दिली.

३. एका व्यक्तीने ग्रंथप्रदर्शन पाहून ‘तुम्ही चांगले व्यवस्थापन करता’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात