विहंगम मार्गाने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था

दूरशेत (पेण) या लहानशा गावात हिंदु राष्ट्राचा जागर !

डावीकडे श्री. बळवंत पाठक आणि सौ. मोहिनी मांढरे

पेण, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – आज शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, तसेच न्यायालयीन व्यवस्था आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून भ्रष्ट कारभार उघड करून त्याला विरोध करायला हवा. आदर्श व्यवस्थेसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच यावरील उपाय आहे. त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील दूरशेत गावामधील श्री वज्रादेवी मंदिरात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. सभेला १७५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. आढावा बैठकीत २ युवकांनी हस्तपत्रक वितरणाच्या सेवांचे दायित्व घेण्यासाठी आणि एका युवकाने फलकप्रसिद्धीसाठी पुढाकार घेतला.

२. सभास्थळी वक्त्यांचे आगमन होत असतांना धर्मप्रेमींनी जोरदार घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले.

विहंगम मार्गाने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी
गुरुकृपायोगानुसार साधना करा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था

सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सर्व योगमार्गांना सामावून घेणार्‍या गुरुकृपायोगाची निर्मिती केली. अष्टांग साधनेचा, तसेच अध्यात्मातील तत्त्वांचा समावेश यात असल्याने व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती अन्य योगमार्गांच्या तुलनेत विहंगम मार्गाने होते. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात