साधना समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच धर्माचरण ! – सौ. सुनिता पाटील, सनातन संस्था

ठाणे येथे साधना शिबिराचे आयोजन !

मार्गदर्शन ऐकतांना जिज्ञासू

ठाणे, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे आज हिंदू पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. त्यामुळे त्यांना हिंदु संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. ऋषिमुनींनी केलेल्या सखोल अभ्यासाचे, तसेच ग्रंथांच्या लिखाणाचे हिंदूंना महत्त्व नाही. साधना समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच धर्माचरण ! चार वर्णांनुसार आचरण केल्यासच आपण खरा धर्म जगतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. सुनीता पाटील यांनी ब्राह्मण विद्यालय, चरई येथे घेण्यात आलेल्या साधना शिबिरात केले. २८ ऑक्टोबर या दिवशी शिबीर घेण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सविता लेले यांनीही स्वभावदोष निर्मूलनाविषयी मार्गदर्शन केले. मीठ-पाण्याच्या उपायांच्या संदर्भातील ध्वनीचित्रफीतही या वेळी दाखवण्यात आली.

सहकार्य

शिबिरासाठी ब्राह्मण विद्यालयाचे सभागृह श्री. केदार जोशी यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले, तर शाळेतील श्री. वैद्य यांना सेवेसाठी पाठवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात