धर्मप्रसार करणे, हा आतंकवाद आहे का ? – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

मालाड (पूर्व) मुंबई येथे  हिंदु धर्मजागृती सभा

डावीकडून सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, दीपप्रज्वलन करतांना गोरक्षनाथजी पैठणकर, सनातनच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे

मुंबई – भारताने धर्मनिरपेक्षता शासनप्रणाली स्वीकारली असल्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हे संविधानाच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करण्यात येत आहे; मात्र वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या वेळी घटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्षता’ (सेक्युलर) हा शब्द घुसडून भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले, हे लक्षात घ्यायला हवे. ‘सेक्युलर’ शब्द घुसडून जर भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र होऊ शकते, तर पूर्वापार भारत हे हिंदु राष्ट्र आहे. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा आमचा घटनात्मक अधिकार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. मालाड येथील कुंदनलाल सभागृहात २८ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या.

सभेच्या प्रारंभी वेदमंत्रपठण करतांना वेदमूर्ती

सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि वेदमूर्ती श्री. गोरक्षनाथजी पैठणकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन करून सभेला प्रारंभ झाला. वज्रेश्‍वरी येथील श्री. विनायक वेदपीठम्चे वेदमूर्ती उदय जोशी आणि वेदमूर्ती श्री. शुभम रामपुरीकर यांनी प्रारंभी वेदमंत्रपठण केले. या सभेला २०० धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

आचार, विचार आणि उच्चार यांनी चांगला समाज घडवण्याचे कार्य सनातन संस्था
करत आहे ! – धर्माचार्य वेदमूर्ती श्री. गोरक्षनाथजी पैठणकर, संस्थापक श्री. विनायक वेदपीठम्

आचार, विचार आणि उच्चार यांनी चांगला समाज घडवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. हिंदूंनी स्वत:ची जातीय आणि प्रांतीय अस्मिता विसरून हिंदु म्हणून एकत्र येणे  आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची सप्तनद्या आणि सप्तसमुद्र हे हिंदु राष्ट्रात आले पाहिजेत, अशी इच्छा होती. महाराजांना राजकारणापुरते मर्यादित ठेवण्याचे काम राजकारणी करत आहेत. आपणाला सिकंदर शिकवला जातो; मात्र पाच पातशाह्यांशी लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. आजचे शिक्षण गुलाम घडवते. गुलाम निर्माण करणारे नव्हे, तर चारित्र्य घडवणारे शिक्षण हवे.

धर्मप्रसार करणे, हा आतंकवाद आहे का ? – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

राजकीय पक्ष, पुरोगामी, आधुनिकतावादी हे सनातनला संपवण्यासाठी चक्रव्यूह रचत आहेत; मात्र हा चक्रव्यूह भेदण्यात संस्थेला यश आले आहे. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक आणि गृहमंत्री यांनी सनातन संस्थेचे नाव कुठेही घेतलेले नाही; मात्र दाभोलकर आणि पानसरे कुटुंब सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. सनातन संस्थेचे अभय वर्तक हे मंत्रालयात मंत्र्याच्या भेटी घेत असल्याचे एका वाहिनीवर दाखवत असतांना अन्य वाहिनीवर ते भूमीगत झाल्याचे सांगितले गेले. देशात अन्य गंभीर संकटे असतांना त्याकडे लक्ष न देता ‘ब्रेकिंग न्यूज’ची माध्यमांना धुंदी चढून सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात येत आहे. धर्मशिक्षण देऊन सनातन संस्था हिंदूंमध्ये धर्माभिमान निर्माण करण्याचे काम करत आहे. भ्रष्टाचार, घोटाळे, हत्या यांचा आरोप असलेल्या राजकीय पक्षांवर बंदी न घालता देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर द्वेषापोटी बंदीची मागणी करण्यात येत आहे. धर्म आणि अध्यात्म प्रसार करणे, हा आंतकवाद आहे का ?

हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा आमचा घटनात्मक अधिकार ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

या वेळी श्री. सुर्वे म्हणाले की, लव्ह जिहाद, आतंकवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद यांमुळे देशात अराजक निर्माण होत आहे. डॉ. दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांनंतर वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात; मात्र कर्नाटक, केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या हत्या होत होऊनही त्याविषयी कधी चर्चासत्रांचे आयोजन केले गेले नाही. सरकारने हिंदूची मंदिरे कह्यात घेतली; मात्र मशीद आणि चर्च यांना हात लावला नाही. शबरीमला मंदिर प्रकरणातून हिंदूंची संघटन शक्ती आणि महत्त्व दिसून आले आहे. देशातील लव्ह जिहाद, आतंकवाद, गोहत्या, धर्मांतर या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे. त्यासाठी तन, मन, धन आणि प्रसंगी प्राणही अर्पण करायला सिद्ध व्हा !

सभेच्या शेवटी श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थित धर्माप्रेमींना हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात