ईश्‍वरी पाठबळ असेल, तर धर्मकार्यातील अडथळे दूर होऊन निश्‍चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

अकोला येथे विदर्भस्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशन

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून पू. अशोक पात्रीकर, अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, श्री. सुनील घनवट, ह.भ.प. एकनाथ महाराज डीक्कर

अकोला – २७ आणि २८ ऑक्टोबर या दिवसांत अकोला येथे जानोरकर मंगल कार्यालयात विदर्भस्तरीय प्रांतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या वेळी सनातनचे विदर्भ प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, ह.भ.प. एकनाथ महाराज डीक्कर यांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी उपस्थित वक्त्यांच्या हस्ते सनातनच्या पंचांगाचे प्रकाशन करण्यात आले.

या अधिवेशनामध्ये अखिल भारत क्षत्रिय महासभा, बजरंग दल, राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत सेवा समिती, श्रीराम सेना, हिंदु क्रांती सेना, वारकरी संप्रदाय यांसह विविध संघटनांचे ६१ पदाधिकारी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

ईश्‍वरी पाठबळ असेल, तर धर्मकार्यातील अडथळे दूर होऊन निश्‍चितपणे हिंदु राष्ट्राची
स्थापना होईल ! – पू. अशोक पात्रीकर, विदर्भ आणि छत्तीसगढ प्रसारसेवक, सनातन संस्था

आतंकवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद यांसारख्या संकटांनी भारताला घेरले असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक झाले आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. ईश्‍वरी पाठबळ असेल, तर धर्मकार्यातील अडथळे दूर होऊन निश्‍चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, याची निश्‍चिती बाळगा. काळ कितीही वाईट असला, तरी भगवंत भक्ताचे रक्षण करणारच आहे.

अधिवेशनाचा प्रथम दिवस

‘धर्मकार्य करत असतांना येणारे अडथळे आणि त्यावरील कायदेशीर उपाय’ यावर हिंदु विधीज्ञ परिषदेेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे कायदेविषयक शंकांचे निरसन करून घेतले. त्यानंतर काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी लव्ह जिहाद, गोरक्षण आणि इतर धर्मकार्य करतांना येणारे अनुभवकथन केले.

अधिवेशनाचा द्वितीय दिवस

१. दुसर्‍या दिवशीच्या सत्रामध्ये ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ याविषयी पू. अशोक पात्रीकर यांनी, ‘लोकशाहीची सद्यस्थिती आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी, तर हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा याविषयी श्री. सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले.

२. ‘सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे  धर्मप्रसार कसा करावा ?, याविषयी श्री. नीलेश टवलारे यांनी माहिती दिली.

३. त्यानंतर स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.

४. सायंकाळी घेण्यात आलेल्या गटचर्चेत हिंदुत्वनिष्ठांनी जिल्ह्यात करण्याच्या धर्मकार्याचे नियोजन केले. समारोपीय सत्रामध्ये ‘येणार्‍या आपत्काळाची भीषणता आणि त्यात सुरक्षित रहाण्यासाठी साधनेचे महत्त्व’ याविषयी पू. अशोक पात्रीकर यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी उपस्थित सर्वांनीच भावावस्था अनुभवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात