अलिबाग येथे मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात म्हणे ‘सनातन आणि समाजसुधारकांच्या हत्या’ या विषयावर चर्चा होणार

  • आयोजकांचा दुसर्‍यांदा ‘कोरेगाव भीमा’ करण्याचा तर विचार नाही ना ? 
  • महाराष्ट्रात झालेल्या समाजसुधारकांच्या हत्या सनातन संस्थेनेच केल्या आहेत, अशा आविर्भावात ही ब्रिगेडी मंडळी बोलत आहेत. देशात न्याययंत्रणा अस्तित्वात असतांना स्वत: न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन सनातन संस्थेला दोषी ठरवू पहाणार्‍या या ब्रिगेडी संघटनांवर पोलीस कारवाई करणार का ?

सातारा – रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे ९ वे राज्यस्तरीय अधिवेशन २७ आणि २८ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. या अधिवेशनामध्ये ‘सनातन संस्था आणि समाजसुधारकांच्या हत्या’ या विषयावर चर्चा होणार असून अन्य विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. पी.एन्.पी. नाट्यगृहात होणार्‍या अधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री श्री. सुनील तटकरे, हार्दीक पटेल, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ करणार आहेत. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात