अष्टांग साधना करून या जन्माचे सार्थक करूया ! – पू. अशोक पात्रीकर

यवतमाळ येथे हितचिंतक शिबिराचे आयोजन

दीपप्रज्वलन करतांना पू. अशोक पात्रीकर

यवतमाळ –  येथील आदर्शनगर भागात २१ ऑक्टोबरला सनातन संस्थेच्या हितचिंतकांसाठी शिबिराचे आयोजन आले होते.  या शिबिरात १५ हितचिंतकांनी सहभाग घेतला. या वेळी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी उपस्थितांना अष्टांग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. ‘अष्टांग साधना कृतीत आणून या जन्माचे सार्थक करुन घेऊया’, असे मार्गदर्शन पू. पात्रीकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी ‘राष्ट्र आणि धर्मकार्यातील योगदान, हे धर्मकार्यच आहे’, असे सांगितले. ‘शिबिरातील मार्गदर्शनामुळे आम्हाला साधना आणि धर्मकार्याची दिशा मिळाली’, असे शिबिरार्थींनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनंदा हरणे यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात