(म्हणे) ‘सनातनवर बंदी घालून डॉ. आठवले यांना अटक करण्याला पोलिसांनी प्राधान्य दिले नाही, तर आगामी काळात सनातन शेकडो व्यक्तींना धर्मद्रोही ठरवून हत्या घडवून आणेल !’ – प्रा. शाम मानव

  • सनातनद्वेषात आकंठ बुडालेले प्रा. शाम मानव आतंकवाद्यांच्या कारवाया, शहरी नक्षलवाद, धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्या यांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! 
  • आतापर्यंतच्या हत्या प्रकरणांत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातन संस्था आणि तिचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कोणताही उल्लेख केलेला नसतांना प्रा. शाम मानव अशा अफवा पसरवून सनातन संस्थेची नाहक अपकीर्तीच करत आहेत. या अपकीर्तीविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

मुंबई – साधकाला अटक केल्यावर त्यांचा नि आमचा काहीही संबंध नसल्याची पुडी सोडणे, ही सनातन संस्थेची कार्यपद्धत असल्यामुळे यावर विश्‍वास न ठेवता आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) मास्टरमाईंड डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना अटक करावी. (आतापर्यंत ज्या साधकांना संशयित म्हणून अन्वेषण यंत्रणांनी अटक केली आहेे, त्यांच्यापैकी एकाही साधकाविषयी सनातनने ‘तो आमचा साधक नसल्याचे’ म्हटलेले नाही; मात्र कह्यात घेतलेल्यांमध्ये जे हिंदुत्वनिष्ठ सनातनचे साधक नाहीत, त्यांच्याविषयी सनातनच्या प्रवक्त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. असे असतांना खोटे आरोप करून प्रा. मानव यांनी स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीच उघड केली आहे ! – संपादक) सनातनवर बंदी घालून आठवले यांना अटक करण्याला पोलिसांनी प्राधान्य दिले नाही, तर आगामी काळात सनातन शेकडो व्यक्तींना धर्मद्रोही ठरवून त्यांची हत्या घडवून आणेल, अशी सनातनद्वेषी गरळओक प्रा. शाम मानव यांनी ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर श्री. मनोज भोयर यांनी घेतलेल्या मुलाखतीत केली. (प्रा. शाम मानव सांगतील तसा तपास अन्वेषण यंत्रणांनी करायचा का ? सनातनद्वेषापोटी पुरोगामी न्यायप्रविष्ट प्रकरणांवर बोलून राज्यघटनेच्या तत्त्वांना कसे नाकारतात, हे प्रा. मानव यांच्या वरील विधानातून लक्षात येते ! – संपादक)

 

शाम मानव यांची सनातनद्वेषी विधाने !

१. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्रात धरपकड वाढल्यावर येथील पोलीस वेगवान झाले, हे खरे असले, तरी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक करत असलेल्या अन्वेषणाविषयी समाधान आहे. (प्रा. मानव यांना पानसरे-दाभोलकर हत्या प्रकरणातील खरे आरोपी मिळण्यापेक्षा हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई होण्यात समाधान आहे, यातच सर्व आले ! – संपादक)

२. हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असल्यामुळे सनातन, हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना यांसारख्या कट्टर आणि देशाला घातक असणार्‍या संघटनांवर कारवाई अशक्य आहे. (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी देशाला घातक असणारे एकतरी कृत्य केल्याचे उदाहरण प्रा. मानव दाखवू शकतील का ? – संपादक)

३. खून करून खुनाचा कट, योजना मारेकर्‍यांच्या मेंदूत रहाणार नाही, अशी स्मृती पुसून टाकण्याची कला संमोहनातून केली जाऊ शकते. ४ जणांच्या हत्येत हीच पद्धत उपयोगात आणली. (संमोहनाद्वारे असा कोणताही प्रकार केला जाऊ शकत नाही, हे यापूर्वीही अनेक संमोहनतज्ञांनी स्पष्ट केलेले आहे. असे असतांना धादांत खोटे बोलणारे प्रा. शाम मानव स्वतःचे हसे करून घेत आहेत ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात