(म्हणे) ‘हत्येत सहभागी असणार्‍या सनातनच्या कार्यकर्त्यांना पकडूनही सनातन संस्थेवर बंदी नाही !’ – मेधा पाटकर

मेधा पाटकर यांची मुक्ताफळे !


आजपर्यंत अनेक अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या साधकांची कसून चौकशी करूनही त्यांना सनातन दोषी आढळले नाही; मात्र सवंग लोकप्रियतेसाठी सनातनचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न मेधा पाटकर करत आहेत. मेधा पाटकर यांनी केलेल्या खोट्या आरोपांविषयी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !

सातारा – डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सहभागी असलेल्या सनातनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले आहे. यातील काही आरोपी असून काही जण संशयित आहेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी देशभरातून मागणी होत आहे; मात्र भाजपमधील काही मंत्र्यांशी त्यांचे लागेबांधे असल्याने अद्यापही सनातनवर बंदी घालण्यात आलेली नाही, अशी मुक्ताफळे स्वयंघोषित समाजसेविका मेधा पाटकर यांनी उधळली. दांडी, गुजरात ते देहली या ‘संविधान सन्मान यात्रे’चे सातारा येथे आगमन झाले. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात