‘साधकांचे त्रास दूर व्हावेत आणि रामराज्याची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी’, यांसाठी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात करण्यात येणारे पंचमुखी हनुमानकवच यज्ञ !

‘संत, साधक आणि धर्माभिमानी करत असलेल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यात वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात अडथळे आणत आहेत. ‘या वाईट शक्तींच्या त्रासांचे निवारण व्हावे आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, यांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पंचमुखी हनुमानकवच यज्ञाचे आयोजन केले आहे.

पानवळ (बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील थोर संत प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात यज्ञविधी पार पडत आहेत. तीव्र शारीरिक त्रास असूनही वयाच्या ७६ व्या वर्षी प.पू. दास महाराज या यज्ञात स्वतः सहभागी होतात. वर्ष २००२ मध्ये साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ फोंडा (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. दास महाराज यांनी ११ पंचमुखी हनुमानकवच यज्ञ केले होते. त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी भारतभर भ्रमण करून सनातनचे सर्वत्रचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे ३५, असे एकूण ४६ पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ केले. आता वाईट शक्तींविरुद्धचे सूक्ष्मातील युद्ध अंतिम टप्प्यात आले असतांना ‘साधकांचे त्रास दूर व्हावेत आणि रामराज्याची शीघ्रातिशीघ्र स्थापना व्हावी’, यांसाठी पुन्हा हे यज्ञ आरंभ करण्यात आले आहेत. १४.१०.२०१८ या दिवशी प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ४९ वा पंचमुखी हनुमानकवच यज्ञ झाला.

 

१. पंचमुखी हनुमानाच्या पाच मुखांच्या दिशा,
कोणत्या मुखाचे पूजन केल्यावर काय कार्य होते ?

पंचमुखी याचा अर्थ पाच दिशांचे रक्षण करणारा.

 

२. पंचमुखी हनुमानकवच यज्ञासाठी वापरण्यात येणारी हविर्द्रव्ये

पंचमुखी हनुमानकवच यज्ञात हनुमंताच्या पाच मुखांसाठी पाच निरनिराळ्या प्रकारच्या समिधांसह तूप आणि फळे यांची आहुती देतात. फळांच्या आहुतीही निरनिराळ्या असतात.

 

३. अग्नीमुहूर्त

हिंदु धर्मात यज्ञ-यागादी करतांना यज्ञाचे शुभ फळ प्राप्त होण्यासाठी यज्ञाचा मुहूर्त निश्‍चित करतांना पंचांगात पृथ्वीवर अग्नी असल्याची निश्‍चिती केली जाते. पंचांगात पृथ्वीवरील अग्नी पहाण्याचे कोष्टक दिलेले असते.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०१८)

 

हनुमंताच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा यांचा आदर्श हनुमंत ! अनिष्ट शक्तींची पीडा दूर करून भक्तांना तारणारा भक्तवत्सल हनुमंत ! प्रभु श्रीरामाची दास्यभक्ती करणारा अन् निष्ठावान योद्धा असलेला धर्मवीर हनुमंत ! लक्ष्मणाचे प्राण रक्षिण्यासाठी संजिवनी वृक्ष असलेला संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच आणणारा आज्ञापालक हनुमंत ! युद्धप्रसंगीही काही क्षण ध्यानस्थ होणारा, म्हणजे आपत्काळातही व्यष्टी अन् समष्टी यांची सांगड घालणारा हनुमंत !

हनुमंताची साधना, भक्ती अन् कार्य यांची महती वर्णन करावी, तितकी थोडीच आहे ! विशेषत्वाने रामराज्यासम असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी झटणार्‍या सनातनच्या साधकांसाठी तर हनुमंताची कृपा मोलाची आहे ! अशा हनुमंताच्या चरणी सनातनच्या साधकांची कोटी कोटी कृतज्ञता ! 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात