(म्हणे) ‘सरकार सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी कधी घालणार ?’ – अजित पवार

निवडणुकीपूर्वीची ही फडफड म्हणायची का ?

भ्रष्टाचार, हत्या आदी गंभीर गुन्हे असलेल्या नेत्यांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एकही गुन्हा नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पद !

मुंबई – काय चालू आहे राज्यात ? पत्रकारांना सरळसरळ धमक्या दिल्या जात आहेत. सनातन संस्थेवर कारवाई का नाही ? आमच्या काळात आम्ही बंदीचा प्रस्ताव पाठवला होता; पण सरकार आता काय करत आहे ? देवेंद्र फडणवीस सरकार संस्थेवर कायमस्वरूपी बंदी कधी घालणार ? कसली वाट बघताय ? असे बोलघेवडे प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी ‘ट्वीट’ करून केले आहेत. (आघाडीचे सरकार असतांना वर्ष २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठवलेला सनातनवरील बंदीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळला होता. त्यामुळे निर्दोष सनातन संस्थेवर टीका करून अल्पसंख्यांकांची मते मिळवण्याचे राजकारण अजित पवार यांनी आता तरी थांबवावे !   संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात