शस्त्रपूजन ही हिंदूंची संस्कृती असल्याने ती कधीही खंडित होणार नाही !

शस्त्रपूजनाला विरोध करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे !

 

टीका : शस्त्रपूजनाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एवढी अत्याधुनिक शस्त्रे कोठून आली, याचे अन्वेषण करून डॉ. मोहन भागवत यांना अटक करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू ! – अधिवक्ता प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष

खंडण : शस्त्रपूजन ही हिंदूंची संस्कृती आहे. शस्त्रपूजन करणे ही सामर्थ्याची परंपरा मानली जाते. पूर्वीच्या काळी ही शस्त्रे म्हणजे राजाच्या वैभवाचे प्रतीक मानली जायची. आजवरचा हिंदूंचा इतिहास पाहिला, तर तो विजयाचाच आहे. त्यामुळे शस्त्रपूजन करणे म्हणजे एकप्रकारे त्या वैभवशाली इतिहासाचे पुनर्स्मरण करून पराक्रमांची धग तेवत ठेवण्यासारखेच आहे. ‘शस्त्रपूजन करतांना ‘शस्त्रांमध्ये देव आहे’, अशी हिंदूंची श्रद्धा असते. त्यामुळे शस्त्रपूजन करणे म्हणजे हिंसेचे पूजन करणे नव्हे, हे टीका करणार्‍यांनी लक्षात घ्यावे !

आंबेडकर यांना हिंदूंचे शस्त्रपूजन दिसते; मात्र धर्मांध नंग्या तलवारी नाचवतात, ते कसे दिसत नाही ? संघाकडून शस्त्रपूजनाच्या वेळी वापरण्यात येणारी शस्त्रे ही परवानाधारक असल्याचे संघाच्या प्रचार विभागाचे मकरंद मुळे यांनी नुकतेच एका वाहिनीवरील चर्चासत्रात सांगितले. नक्षलवादाच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असल्याने आणि त्यात प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग असल्याचे दिसू लागल्याने त्यांपासून सर्वांचे लक्ष हटवण्यासाठीच आंबेडकर यांच्याकडून असे आरोप केले जात नसतील कशावरून ?

हिंदू आज निःस्तेज होत आहेत. हिंदूंवर परकीय आक्रमणे होत आहेत. कधी नव्हे एवढी हिंदूसंघटनाची आवश्यकता निर्माण झाली असतांना शस्त्रपूजनाला विरोध करून हिंदूंची मने तोडू पहाणार्‍या आणि हिंदु संस्कृती खंडित करू पहाणार्‍या आंबेडकर यांसारख्यांना हिंदूंनीच आता विरोध करायला हवा ! तसेच कुणाच्याही मागण्यांवरून शस्त्रपूजनाची गौरवशाली परंपरा हिंदूंनी कधीही खंडित होऊ देऊ नये !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात