चर्चासत्राच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे वृत्तवाहिन्यांचे निवेदक !

‘वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्राच्या वेळी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे प्रवक्ते, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांना निमंत्रित करण्यात येते; मात्र काही हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांचे निवेदक या प्रवक्त्यांशी बोलतांना सर्वसाधारण शिष्टाचाराच्या मर्यादाही पाळत नसल्याचा अनुभव वारंवार येतो. या निवेदकांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रवक्त्यांशी तावातावाने बोलणे, भूमिका नीट मांडू न देणे, मध्ये बोलून वाक्ये तोडणे, उद्धटपणे प्रश्‍न विचारणे, त्यांना तुच्छ लेखणे, एकांगी चर्चा करणे, विरोधकांना अधिक वेळ देऊन प्रवक्त्यांना अल्प वेळ देणे आदी प्रकारे अशोभनीय वर्तन केले जाते. ‘गेस्ट’ अर्थात ‘पाहुणे’ म्हणून वृत्तवाहिन्या स्वतःहून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रवक्त्यांना बोलावतात, अशा अतिथी म्हणून बोलावलेल्या प्रवक्त्यांशी कसे बोलावे, याचे साधे भानही या निवेदकांना नसते.

‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीचे निवेदक प्रसन्न जोशी, ‘रिपब्लिक’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे निवेदक अर्णब गोस्वामी, ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे निवेदक राहुल कंवल, ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीच्या निवेदिका निखिला म्हात्रे यांंच्यासारखे पत्रकार समाजाला काय दिशा देणार ?

चर्चासत्रांच्या वेळी सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांशी तावातावाने बोलतांना ‘एबीपी माझा’चे निवेदक प्रसन्न जोशी

२९ सप्टेंबर या दिवशी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीवर श्री गणेशमूर्ती विसर्जनासंबंधी ‘प्रदूषण टाळणारं विसर्जन धर्मविरोधी कसं ?’ या विषयावर झालेल्या चर्चेत निवेदक प्रसन्न जोशी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांच्याशी तावातावाने बोलत होते. या वेळी पडद्यावर ‘धर्म बुडाल्या’ची बोंब ठोकणार्‍यांचं काय करायचं ?, असे शीर्षक दाखवण्यात येत होते.

 

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याशी
हातवारे करून त्यांच्या अंगावर धावून जाणारे ‘इंडिया टुडे’चे निवेदक
राहुल कंवल यांच्यासारखे असभ्य पत्रकार हा पत्रकारितेला लागलेला कलंक !

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याशी हातवारे करून त्यांच्या अंगावर धावून जाणारे ‘इंडिया टुडे’चे निवेदक राहुल कंवल

८ ऑक्टोबर या दिवशी ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीनेे कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रसारित करतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना निमंत्रित केले होते. त्या वेळी निवेदक राहुल कंवल हे श्री. रमेश शिंदे यांच्याशी शिष्टाचाराच्या मर्यादा ओलांडून त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी करत होते आणि त्यांना बोलूही देत नव्हते.

सर्व चर्चासत्रांच्या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचे प्रवक्ते आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांनी त्यांची बाजू शांतपणे आणि स्थिर राहून मांडली. साधनेच्या बळामुळे शांत राहून योग्य भूमिका मांडता येते, हे यावरून लक्षात येते !

२१ ऑगस्ट या दिवशी ‘रिपब्लिक’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवर नालासोपारा प्रकरणी ‘सनातन टेरर प्लॉट’ या मथळ्याखाली झालेल्या चर्चेत निवेदक अर्णब गोस्वामी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना ‘तुम्ही बॉम्ब का बनवता ?’, असा प्रश्‍न विचारत होते. त्या वेळी न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन गोस्वामी हे देशभरातील तुमची सर्व केंद्रे बंद केली पाहिजेत आणि जयंत आठवले यांना अटक केली पाहिजे, तरच आतंकवाद थांबेल’, अशी विधाने करत श्री. राजहंस यांना उत्तर देतांना मध्येच थांबवत होते.

सनातनच्या प्रवक्त्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे निवेदक प्रसन्न जोशी आणि अभिजित करंडे

डावीकडून श्री. चेतन राजहंस, प्रसन्न जोशी, तुळशीदास भोईटे आणि हातवारे करत बोलणारे अभिजित करंडे

२७ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना चर्चासत्रासाठी निमंत्रित केले होते. वृत्तवाहिनीचे निवेदक प्रसन्न जोशी आणि अभिजित करंडे यांनी ‘कोर्ट मार्शल’ नावाच्या कार्यक्रमात न्यायाधिशांच्या भूमिकेत जाऊन श्री. राजहंस यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एकूणच सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून या वृत्तवाहिनीने सनातनवर बेछूट आरोप केले.

‘मुलाखत कशी घेऊ नये’, हे शिकवणारे हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांचे मुलाखत घेणारे निवेदक !

  • आपण बोलावल्याने आलेल्यांचा मान आपण राखला पाहिजे, हेही त्यांना कळत नाही ! 
  • यांच्यामुळे पुढील पिढीवर काय संस्कार होतील, याचा विचारही करवत नाही !’ 
    – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात