‘स्टिंग ऑपरेशन’विषयी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘इंडिया टुडे’चे सूत्रसंचालक राहुल कंवल यांचा आक्रस्तळेपणा आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी शांतपणे मांडलेली सूत्रे यांविषयी समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या प्रतिक्रिया !

‘स्टिंग ऑपरेशन’साठी ‘इंडिया टुडे’ला काँग्रेसने किती
पैसा पुरवला ? – सामाजिक संकेतस्थळावर विचारलेला प्रश्‍न

‘इंडिया टुडे’ने सनातनची जाणूनबुजून अपकीर्ती करण्यासाठी आटापिटा करूनही हिंदूंनी हिंदु जनजागृती समितीलाच पाठिंबा दर्शवणे, ही समितीच्या राष्ट्र आणि धर्मनिष्ठ कार्याची पोचपावतीच !

१. मंजुल : ‘कार्यक्रमात राहुल कंवल यांनी त्यांचा आवाज अर्णब (पत्रकार अर्णब गोस्वामी) यांच्याएवढा चढवला होता; पण प्रवक्ता महोदय शांतपणे भूमिकेवर टिकून होते. ‘इंडिया टुडे’चे ‘स्टिंग’ समितीच्या प्रवक्त्यांपुढे ‘असाहाय्य’ दिसून येत होते. या ‘स्टिंग’मध्ये सनातन संस्थेपेक्षा पोलीस आणि सरकार यांची पोलखोल होत असल्याचे अधिक दिसून आले.’ (मंजुल हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार असून ‘ट्विटर’ या सामाजिक संकेतस्थळावर त्यांचे १ लाख अनुयायी आहेत.)

२. शंखनाद : ‘राहुल कंवल, तुम्ही ओढून ताणून आणलेला आक्रमणपणा, हे तुमचे बनावट वृत्तसंकलन आणि चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे पुरावे सादर करणे, यांवर पडदा टाकण्यास अयशस्वी ठरले. तुमच्या स्वत:च्याच चित्रीकरणातून तुम्ही पुरावे समोर येऊ दिले नाहीत, हे हास्यास्पद आहे. प्रत्यक्षात तुम्हीच खर्‍या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहात.’

३. आज का मोगली : ‘राहुल कंवल’ (कथित) भगवा आतंकवादाच्या ‘स्टिंग’साठी तुम्हाला काँग्रेसने किती पैसे दिले ? मदरसे, मशिदी येथे आतंकवाद उत्पन्न होतो, हे दाखवल्यास तुमची बोबडी वळेल. हिंदु असून हिंदूंना अपकीर्त करत आहात.’ (‘आज का मोगली’, हे संबंधित ‘ट्वीटर युझर’चे टोपणनाव आहे.)

४. सिद्धार्थ एस्.जी. : ‘कोणत्याही प्रकरणात कोणावरही आरोप करता, तेव्हा तुम्ही बरोबर असता’, असे होत नाही. तुम्ही बरोबर असाल, तर पोलिसांत तक्रार करा.’

५. ऐश्‍वर्या भट : ‘राहुल कंवल, तुम्ही निवेदक आहात. त्यामुळे केवळ प्रश्‍न विचारून उत्तर ऐकू शकता. लोकांना त्यांचे मत ठरवू द्या. तुमचे मत प्रसारित करून लोकांवर लादू नका. त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. तुम्ही किती अविचारीपणे तुमचे मत लादून त्यांना (श्री. रमेश शिंदे यांना) चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्यांच्यावर ओरडून त्यांना उत्तर देतांनाही थांबवत आहात, हे आम्ही पाहिले आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात