(म्हणे) ‘डॉ. दाभोलकरांची हत्या केली, ते सनातनचेच लोक !’ – विद्या चव्हाण

मुंबई, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र सरकार सांगत आहे की, सनातनचा याच्याशी काही संबंध आहे, असे पुरावे अद्याप मिळाले नाहीत, असे ‘आज तक’च्या पत्रकारांनी विचारल्यावर विद्या चव्हाण म्हणाल्या की, असे न्यायालयाचे म्हणणे आहे, आमचे नाही. सत्ता देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि सनातनवाल्यांची आहे. हा दशमुखी रावण आहे. त्यांचे एक तोंड सनातन आहे, एक तोंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे, एक तोंड विश्‍व हिंदू परिषदेचे आहे; पण सनातन संस्था खुनी आहे. शिवसेनेच्या संजय राऊत याने हा सत्कार केला आहे. तो ‘सामना’मध्ये लिहितो की, ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का’, म्हणून आज आम्ही या राऊतला विचारायला आलो आहोत की, ‘तुझं डोकं तरी ठिकाणावर आहे का ?’ शिवसेनेला महाराष्ट्रात यायचे आहे कि नाही ? ही मनुवादी संस्था आहे. हा पुनाळेकर जो वकील आहे, ज्याने मागे सांगितले होते की, ‘मॉर्निंग वॉक’ला जाऊन दाखवा आम्ही तुमची हत्या करू. जोवर मोदी सरकार आहे आणि फडणवीस सरकार आहे तोवर यांच्यावर बंदी येणार नाही. आम्ही सनातन संस्थेचा सत्कार होऊ देणार नाही. (इतरांना अरे-तुरेची भाषा करणार्‍या आमदार चव्हाण यांनी त्यांच्या पक्षाची (कु)संस्कृती काय आहे, हेच यातून दिसून येते. तसेच अधिवक्ता पुनाळेकर यांच्या तोंडी वाटेल ती विधाने घालून स्वत: खोटारडेपणा करण्यातही पटाईत आहोत, हेसुद्धा चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात