सनातन संस्थेला कधीही साहाय्य करण्यास सिद्ध आहे ! – श्री. प्रशांत सातव, भाजप

बारामती येथे श्री. प्रशांत सातव यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या धर्मरथ प्रदर्शनाचे पूजन

धर्मरथाचे पूजन करतांना श्री. प्रशांत सातव

बारामती (जिल्हा पुणे) – ‘सनातनचे कार्य चांगले आहे. तुम्हाला कधीही साहाय्य लागल्यास सांगा मी ते करण्यास सिद्ध आहे.’, असे मत भाजपचे श्री. प्रशांत सातव यांनी व्यक्त केले. २ ऑक्टोबर या दिवशी कारभारी चौक कसबा येथे सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

येथे धर्मरथाच्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांचे प्रदर्शन २ आणि ३ ऑक्टोबर या दिवशी लावण्यात आले होते. या धर्मरथाचे पूजन श्री. सातव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या वेळी हॉटेल स्नेहाचे मालक श्री. संतोष सातव आणि श्री. अजित गुळुमकर हेही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात