(म्हणे) ‘सनातनवर कारवाई का नाही ?’- प्रकाश आंबेडकर

संभाजीनगर येथे भारिप आणि एम्आयएम् यांच्या युतीची जाहीर सभा

सनातनविरुद्ध नक्षलवाद वापरण्याची धमकी देणार्‍या प्रकाश आंबेडकर यांच्यावर शासनकर्ते कारवाई करणार कि नाही ?

संभाजीनगर – सनातनला बॉम्बची आवश्यकता कशासाठी आहे ? सनातनवर कारवाई का होत नाही, असे भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे विचारले. येथे भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि एम्आयएम् यांच्या युतीची जाहीर सभा घेण्यात आली. यामध्ये ते बोलत होते. संभाजीनगरच्या जबिंदा लॉन्सवर पार पडलेल्या या सभेत अनुसूचित जाती-जमातीतील लोक आणि मुसलमान यांची संख्या लक्षणीय होती. या सभेत आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. सभेत उपस्थित असदुद्दीन ओवैसी यांनीही मोदी यांच्यावर टीका केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात