(म्हणे) राजकीय पक्षांनी जहालमतवादी संघटनांपासून दूर रहावे ! – चेल्लाकुमार, सचिव, अखिल भारतीय काँग्रेस समिती

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सनातन संस्थेला क्लिन चीट दिल्याचे प्रकरण !

जनतेने काँग्रेससारख्या हिंदुद्वेष्ट्या आणि आणिबाणी लादणार्‍या हुकूमशाही राजकीय पक्षापासून दूर रहावे, असेही आवाहन करता येईल ! हल्लीच वरवरा राव, अरुणकुमार यांसारख्या शहरी नक्षलवाद्यांना पकडण्यात आल्यानंतर काँग्रेसने त्यांना नक्षली कारवायांसाठी निधी पुरवल्याचा आरोप होत आहे, त्याविषयी चेल्लाकुमार यांना काय म्हणायचे आहे ? पत्रकारही असे प्रश्‍न काँग्रेसवाल्यांना पत्रकार परिषदेत विचारत नाहीत का ?

चेल्लाकुमार

पणजी – राजकीय पक्षांनी जहालमतवादी संघटनांपासून दूर रहावे, मग ती आध्यात्मिक संघटना असो किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची संघटना असो, असा सल्ला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव तथा काँग्रेसचे गोवा प्रभारी ए. चेल्लाकुमार यांनी दिला आहे. (ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी काँग्रेसमध्येही जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. स्वातंत्र्यानंतर जहाल विचारसरणीचे लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांचे विचार आचरणात न आणल्याने देशाची ७० वर्षांत भौतिक प्रगती झाली, त्यापेक्षा नैतिक आणि सांस्कृतिक अधोगती अधिक झाली. सीमावाद चिघळत राहिले. त्यामुळे जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. – संपादक)

सनातन संस्थेवर विविध प्रसारमाध्यमांतून बिनबुडाचे आरोप होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मगोपचे अध्यक्ष श्री. दीपक ढवळीकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनातन संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून सनातन संस्थेचे कार्य प्रथम जाणून घेण्याचे आवाहन विरोधकांना केले होते. श्री. दीपक ढवळीकर यांनी सनातन संस्थेला क्लिन चीट दिल्याच्या प्रकरणी प्रसारमाध्यमाकडे बोलतांना चेल्लाकुमार यांनी हा सल्ला दिला.(काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानमध्ये जाऊन मुशर्रफ यांच्या खांद्याला खांदा टेकवून व्यासपिठावर बसतात आणि भारतातील मोदी सरकारच्या विरोधात तेथे बोलतात. हा देशद्रोह काँग्रेसला चालतो का ? काँग्रेसचे दिग्विजय सिंह कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा लादेनजी असा उल्लेख करतात, तर नुकत्याच कह्यात घेण्यात आलेल्या नक्षल समर्थकांना काँग्रेसने निधी पुरवल्याचा काँग्रेसवर आरोप होत आहे. त्यामुळे कोणी कोणाला पाठिंबा द्यावा अथवा देऊ नये, हे काँग्रेसने सांगू नये ! – संपादक)

चेल्लाकुमार पुढे म्हणाले, कोणीही जहालमतवादी संघटनेला पाठिंबा देऊ नये. काँग्रेस पक्ष नेहमी समाजात फूट पाडण्याच्या विरोधात आहे. (गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करून देशातील समाजात फूट पाडण्याशिवाय आणखी काही केले का ? – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात