सनातनद्वेष्ट्यांकडून सनातन संस्थेच्या होत असलेल्या अपर्कीतीच्या विरोधात केरळमध्ये समाजाकडून मिळालेला चांगला प्रतिसाद

प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे रहाणारे
असे धर्मप्रेमी हीच सनातन संस्थेची म्हणजेच हिंदु धर्माची खरी शक्ती होय  !

कु. प्रणीता सुखठणकर

१. केरळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी घरामध्ये पाणी घुसल्याने भाड्याच्या खोलीत रहाणार्‍या एका धर्मप्रेमीची पुष्कळ हानी झाली, तरी पुरानंतर ते केरळमधील सनातनच्या आश्रमात आले आणि त्यांनी ५०० रुपये अर्पण केले. आर्थिक स्थिती चांगली नसतांना भाव असल्यामुळे त्यांनी आनंदाने अर्पण केले. याविषयी ते म्हणाले की, आश्रमात आल्यावर सकारात्मक वाटते. मंदिरापेक्षा येथे चांगले वाटते.

२. एक प्रतिष्ठित हिंदुत्वनिष्ठ केरळमधील सेवाकेंद्रात आले होते. या हिंदुत्वनिष्ठांनी पूर्वी अल्प दरात सेवाकेंद्रासाठी जागा भाड्याने दिली होती. सेवाकेंद्रात आल्यावर त्यांनी आपुलकीने सनातन संस्थेवर होत असलेल्या खोट्या आरोपांविषयी जाणून घेतले. तसेच आस्थेने त्यांनी विचारले, ‘‘तुम्हाला काही त्रास होत नाही ना?’’ यावरून त्यांना संस्थेविषयी खूप विश्‍वास आणि आदर असल्याचे वाटले.

३. एक हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यक्रमात साधक गेले होते. तेव्हा त्या संघटनेचे प्रमुख साधकांना बघूनच म्हणाले, ‘‘आपणाला एकत्र कार्य करायचे आहे.’’ त्यांच्या  कार्यकर्त्यांनीही नंतर सनातन संस्थेच्या होत असलेल्या अपर्कीतीविषयी विचारपूस केली. ते खूप आदरपूर्वक बोलत होते.

४. सनातन प्रभातच्या एका वर्गणीदाराला संपर्क केला असता, त्यांनी सनातन संस्थेविषयी विचारपूस केली. साधकांनी त्यांना वस्तूस्थिती सांगितल्यावर ते लगेच म्हणाले, ‘‘प्रसारमाध्यमे जी वृत्त प्रसारित करत आहेत, त्यावर विश्‍वास नाही.’’

५. एका मंदिरात प्रत्येक आठवड्याला ग्रंथप्रदर्शन लावण्यात येते. तेथे ३ लोकांनी येऊन संस्थेच्या सद्यस्थितीविषयी विचारणा केली. ते नियमित मंदिरात येतात. त्यांनी सांगितले, ‘‘आम्हाला तुमच्यावर विश्‍वास आहे आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत.’’

– कु. प्रणीता सुखठणकर, केरळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात