(म्हणे) ‘सनातनच्या वाढत्या मुजोरीला फडणवीस सरकारचा मूक पाठिंबा !’ – हर्षल बागल

वीर भगतसिंग संघटनेचे प्रवक्ते
हर्षल बागल यांचा पत्रकार परिषदेत बिनबुडाचा आरोप

कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) – सनातनच्या हिटलिस्टवर जितेंद्र आव्हाड, श्रीमंत  कोकाटे, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, श्याम मानव यांची नावे आल्याचे स्पष्ट झाले आहे. धार्मिक आणि जातीय आतंकवाद पसरवू पहाणार्‍या सनातनने याआधीही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना राज्य सरकारने ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी. कदाचित सनातनच्या वाढत्या मुजोरीला फडणवीस सरकारचा मूक पाठिंबा आहे, त्यामुळे राज्यसरकार याची नोंद घेत नाही, असा बिनबुडाचा आरोप वीर भगतसिंग संघटनेचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी पत्रकार परिषदेत केला. (असे असते तर सनातनच्या अटकेत असणार्‍या साधकांचे खटले जलद गतीने सोडवण्यासाठी सरकारने सांगितले असते ! सनातन संस्था ही धर्माचा प्रसार करणारी संस्था असून विचारांचा लढा विचाराने देणारी आहे. तिचे कार्य न जाणता अविचारी भाष्य करून बागल स्वत:चे हसेच करून घेत आहेत. – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात