गडहिंग्लज येथे अनेक भाविकांकडून नदीतील वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन !

नगरपालिकेच्या मूर्तीदान मोहिमेला भाविकांचा अल्प प्रतिसाद !

हिरण्यकेशी नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना भाविक

गडहिंग्लज (कोल्हापूर) – येथे नगरपालिकेच्या वतीने गणेशमूर्ती दान मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पर्यावरणवाले, अंनिस आणि धर्मद्रोही लोक यांनी सहभाग घेतला होता; मात्र या मोहिमेकडे दुर्लक्ष करून अनेक भाविकांनी हिरण्यकेशी नदीच्या घाटावर वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. नगरपालिकेच्या मूर्तीदान मोहिमेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

येथील नगरपालिकेकडून अनेक वर्षे मूर्तीदानाची मोहीम राबवण्यात येत आहे. नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी यांनी नगरपालिकेचे टॅ्रक्टर, वाहने, कर्मचारी घेऊन ही मोहीम राबवत होते. या मोहिमेसाठी त्यांनी सर्व सुविधांचा वापर केला होता. मूर्तीदान घेण्यासाठी नगरपालिकेने लक्षावधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव बांधले होते. हे सर्व करूनही भाविकांनी याकडे दुर्लक्ष करून वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. नगरपालिकेला केवळ २३८ मूर्ती दान स्वरूपात मिळाल्या.

बेेळगुंदी गावात वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन !

बेळगुंदी (तालुका गडहिंग्लज) गावात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या वतीने ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ राबवण्यात आली. या मोहिमेच्या वेळी कार्यकर्त्यांनी संपूर्ण गावात हस्तपत्रके देऊन शास्त्रानुसार गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याविषयी भाविकांना आवाहन केले. त्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मोहिमेचे बेळगुंदी येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. बाळू पोवार हे सहभागी झाले होते. ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत मला शास्त्रीय माहिती नसल्याने अनेक मूर्ती दान होत होत्या; मात्र येथून पुढे मी दायित्व घेऊन गावातील गणेशमूर्ती नदीत विसर्जन करण्यास पुढाकार घेईन.’’ त्याप्रमाणे गावातील अनेक जणांनी मूर्ती दान न करता नदीत विसर्जन केले. त्यामध्ये त्यांचा मुलगा श्री. अमर पोवार यांनीही सहभाग घेतला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात