पुणे जिल्ह्यात सनातनच्या विविध उपक्रमांना समाजातून वाढता प्रतिसाद !

सनातनची ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ !

प्रवचन घेतांना साधक

 

येवले चहा दुकानात स्क्रीनवरून प्रबोधन (वर्तुळात)
सनातन सत्यदर्शन अंक वाचतांना धर्मप्रेमी

पुणे – धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन का करावे, या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती समाजाला व्हावी या दृष्टीने सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील मिकासा सोसायटी आणि मुल्लानगर येथील गणेशोत्सव मंडळात येथे गणपतीविषयक सर्व माहिती देणारे प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ ९५ जणांनी घेतला. मुल्लानगर येथील गणेशोत्सव मंडळात प्रबोधनपर फ्लेक्स प्रदर्शन आणि सनातननिर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच मंडळाच्या अहवालात धर्मप्रबोधनपर लेखाला प्रसिद्धी देण्यात आली.

मामलेदार कचेरी चौक, शिवाजी रस्ता येथील ‘येवले चहा’, या दुकानातील स्क्रीनवर ‘गणेश उपासना’ आणि ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयीची माहिती डिस्ल्पेला चालू असून या माध्यमातूनही समाजप्रबोधन करण्यात येत आहे. वारजे आणि कर्वेनगर भागात गणेशोत्सव मंडळ आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांना भेटून ‘सनातन सत्यदर्शन’ या विशेषांकाविषयी माहिती सांगण्यात आली.

सत्यदर्शन विशेषांक वितरणात धर्मप्रेमींचा सहभाग !

१. श्री. आप्पा बराटे यांना भेटल्यावर त्यांनी अंक प्रायोजित केले आणि ‘हा अंक प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे’, असे ते म्हणाले.

२. अधिवक्ता पडवळ यांनी अंक घेऊन सोसायटीमधील लोकांना दिले.

३. श्री. मोहन ठेकेदार यांनी स्वतःहून जादा अंक मागून घेतले.

आव्हाळवाडी येथे लहान मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती !

एकता मित्रमंडळ, आव्हाळवाडी येथे १५ सप्टेंबर या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ‘सनातन सत्यदर्शन विशेषाकां’विषयी माहिती देण्यात आली. या वेळी ५० लहान मुले आणि २५ मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष

१. लहान मुलांकडून ‘ओम गं गणपतये नम: ।’ हा नामजप करवून घेण्यात आला. मंडळातील कार्यकर्त्यांनी ‘मुलांकडून असा जप आम्ही नियमित करून घेऊ’, असे सांगितले.

२. हे प्रवचन आयोजित करण्यात धर्माभिमानी श्री. अजित आव्हाळे यांनी विशेष पुढाकार घेतला.

नेरे येथे प्रवचनासाठी लोटले अख्खे गाव !

नेरे (तालुका भोर) येथील बालसिद्धेश्‍वर गणेशोत्सव मंडळात सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ज्येष्ठ गौरी आणि श्री गणेशपूजन यामागील अध्यात्मशास्त्र’ या प्रवचनास ५०० हून अधिक जण, म्हणजे संपूर्ण गावच उपस्थित होते. दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. बापू सावले यांनी पुढाकार घेऊन या प्रवचनाचे आयोजन केले होते.  ‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे’, अशी सामूहिक प्रतिक्रिया बहुतांश सर्वांनी व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात