सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म यांचेे कार्य अतिशय कौतुकास्पद ! – विनय तेंडुलकर, गोवा प्रदेशाध्यक्ष, भाजप

श्री. विनय तेंडुलकर

सनातन संस्थेचे कार्य राष्ट्र आणि धर्म यांचेे आहे. अतिशय कौतुकास्पद कार्य चाललेले आहे. राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून येणार्‍या संकटांना ध्येर्याने सामोरे जावे. मीही सनातन प्रभातचा वाचक आहे. तुम्ही दिलेल्या धर्मशिक्षणामुळे चांगले समाजप्रबोधन होत आहे, असे कार्य अविरतपणे करत रहा, असे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. विनय तेंडुलकर म्हणाले. तसेच तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा !, असेही ते म्हणाले. सनातनचे साधक श्री. धनंजय हर्षे यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीच्या संदर्भात श्री. तेंडुलकर यांना अवगत केले असता त्यांनी वरीलप्रमाणे अभिप्राय व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात