(म्हणे) ‘सनातनच्या गोव्यातील अड्ड्याचे अन्वेषण करा !’

कॉ. पाटणकर यांचे नेहमीचे तुणतुणे

सहस्रो लोकांना ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारा आणि राष्ट्र-धर्म कार्याचा प्रेरणास्रोत असलेल्या सनातनच्या आश्रमाला ‘अड्डा’ म्हणणे हे कॉ. पाटणकर यांच्या विकृत मानसिकतेचे लक्षण आहे !

कराड – अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या सनातनकडून झाल्याचे अन्वेषण यंत्रणांकडून स्पष्ट झाले आहे. (डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या सनातनकडून झाल्याचे कोणत्याही न्यायालयात स्पष्ट झालेले नाही. कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी तर नुकतेच गौरी लंकेश हत्या प्रकणात कोणत्याही संस्थेचा सहभाग असल्याचे सिद्ध झालेले नाही, असे सांगितले आहे. इतके सगळे असतांना कॉ. पाटणकर मात्र स्वयंघोषित न्यायालयाप्रमाणे या हत्या सनातनने केल्या असे धादांत खोटे आरोप करत आहेत ! – संपादक) त्यामुळे या हत्यांमागील सूत्राधार पकडण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी गोव्यातील सनातनच्या अड्ड्याचे अन्वेषण करावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉ. भारत पाटणकर यांनी केली.

डिसेंबरपर्यंत गोव्यातील सूत्रधारावर कारवाई न झाल्यास श्रमिक मुक्तीदल पदयात्रेद्वारे कोल्हापूरपासून गोव्यापर्यंत पोहोचेल, अशी चेतावणी श्रमिक मुक्ती दलाच्या राज्यव्यापी मेळाव्यात देण्यात आली. (या धमकीची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन कॉ. भारत पाटणकर आणि श्रमिक मुक्ती दल यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात