चेन्नई येथे सनातनच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ नेते एकटवले !

व्यासपिठावर बोलतांना श्री. राधाकृष्णन्

चेन्नई – येथील कुयपेट्टई येथे शिवसेनेच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवला. या बैठकीत दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आदरांजली वहाण्यात आली, सबरीमला मंदिराच्या प्रकरणी न्यायालयीन आदेशाविषयी चिंता व्यक्त करण्यात आली, तसेच सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचा निषेध करण्यात आला.

या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे अनुमाने ५० पदाधिकारी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् उपस्थित होत्या. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘साम्यवादी आणि कथित विचारवंत यांनी सनातनवर बंदी आणण्यासाठी मोठे षडयंत्र रचले आहे. प्रसारमाध्यमांतून एकतर्फी वृत्त प्रसिद्ध केले जात आहे.’’ या वेळी अध्यक्षपदावरून बोलतांना श्री. राधाकृष्णन् यांनी श्रीगणेश मूर्ती बसवण्यासाठी अनुमती देण्यासाठी नाहक अटी घालणार्‍या तमिळनाडूतील विद्यमान सरकारचे पितळ उघडे पाडले. अशा प्रकारच्या अनेक कोपरा बैठका शिवसेना आयोजित करणार असल्याचेही श्री. राधाकृष्णन् यांनी सांगितले.