सनातनवरील संभाव्य बंदीच्या मागणीचा निषेध !

वांद्रे पूर्व येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई – निष्पाप हिंदुत्वनिष्ठांच्या अटकेमागील षड्यंत्राची चौकशी करावी, नक्षलवादी आणि देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करावी या, तसेच सनातन संस्थेवर होत असलेल्या अन्याय्य बंदीच्या मागणीच्या विरोधातील निवेदन वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सत्यनारायण बजाज यांना १० सप्टेंबर या दिवशी देण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. लक्ष्मण जठार, श्री. उमाजी मुळम आणि सनातनचे श्री. मंजुनाथ पुजारी उपस्थित होते. वरील मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटना यांनी ९ सप्टेंबर या दिवशी अंधेरी आणि भांडुप स्थानकाच्या शेजारी आणि १० सप्टेंबर या दिवशी मुलुंड स्थानकाबाहेर संयत मार्गाने आंदोलन केले होते. या वेळी या आंदोलनाच्या समर्थनार्थ सहस्रो हिंदूंनी निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या आणि या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात