विठुमाऊलीच्या रूपातील गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी ! – पेण येथील मूर्तीकाराचे मत

श्री गणेशाची अन्य देवतेच्या रूपात घडवलेली नव्हे, तर गणरायाच्या रूपातच सिद्ध केलेल्या मूर्तीत गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि त्याचा खर्‍या अर्थाने गणेशभक्तांना लाभ होतो. विविध रंगरूपातील गणेशमूर्तींची मागणी केली जाणे, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचेच लक्षण !

पेण – यंदा विठुमाऊलीच्या रूपातील गणेशमूर्तींसाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे, अशी माहिती येथील मूर्तीकार निलेश समेळ यांनी दिली. एल्ईडी लाईटवाल्या गणेशमूर्तींचीही अधिक मागणी होत आहे. यात मूर्तीला आकर्षक आणि रंगीबेरंगी एल्ईडी दिव्यांची सजावट करण्यात येते. अमेरिकन डायमण्ड यांनी सजावट केलेल्या मूर्तींनाही सर्वाधिक मागणी असल्याचेही ते म्हणाले. (विदेशी पद्धतीची सजावट करण्यापेक्षा नैसर्गिकदृष्ट्या आणि धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे  सजावट केल्यास सर्वांनाच त्यातून लाभ होईल ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात