श्री गणेश पूजाविधी (Audio)

१. देशकाल (वर्ष २०१९)

पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील ‘देशकाल’ म्हणावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणपथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरेे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके विकारीनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ इंदू वासरे हस्त चित्रा दिवस नक्षत्रे शुक्ल योगे वणिज् करणे तुला स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे सिंह स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये वृश्चिक स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ धनु स्थिते वर्तमाने श्रीशनैश्‍चरौ शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवङ् ग्रह-गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…

२. ‘देशकाला’च्या संदर्भातील सूचना

पंचांग
पंचांग

१. पंचांग पाहून वरील संस्कृत लिखाणातील ‘अमुक’ या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा.

२. ज्या प्रदेशाला ‘दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे’ हे वर्णन लागू नसेल किंवा प्रदेशाचा ‘देशकाल’ पूजकाला ठाऊक नसेल, त्या वेळी वर उल्लेखिलेल्या शब्दांच्या ठिकाणी ‘आर्यावर्त देशे’ असे म्हणावे.

 

ज्यांना वरील ‘देशकाल’ म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर ‘संकल्प’ उच्चारावा.

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च ।

योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् ।।

अर्थ : तिथी, वार, नक्षत्र, योग, करण इत्यादींच्या उच्चारणाचे सर्व फल श्रीविष्णूच्या स्मरणाने प्राप्त होते; कारण सर्व जगच विष्णुमय आहे.