अमरावती येथे भागवत सप्ताहात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन

अमरावती – नृसिंह-सरस्वती कॉलनी, गोपालनगर या परिसरात भागवत सप्ताहामध्ये सनातन संस्थेच्या सौ. छाया टवलारे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेतले. या वेळी ‘भागवत सप्ताहामध्ये प्रत्यक्ष ईश्‍वर येत असल्याने भाव ठेवल्यास लाभ होतो’, याविषयी माहिती दिल्यावर उपस्थितांनी ‘अशी माहिती आम्हाला याआधी कुठेच मिळाली नाही’, असे सांगितले.

सौ. छाया टवलारे यांनी कार्यक्रमस्थळी अव्यवस्थित असलेली चप्पल व्यवस्था पाहून ती व्यवस्थित ठेवण्याचे लाभ सांगितल्यावर त्या दिवसानंतर येणारे लोक आपणहून चप्पल व्यवस्थित रांगेत ठेवायला लागले.

सौ. छाया टवलारे यांच्या शेजारील एका महिलेने प्रतिक्रिया व्यक्त केली की, ‘अनेक वर्षांपासून मी तुम्हाला बाहेर सनातनच्या सेवेसाठी जातांना पहाते; परंतु आज ही माहिती ऐकून तुम्ही खरंच उत्तम कार्य करत असल्याचे माझ्या लक्षात आले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात