सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही ! – सुरेश हाळवणकर, आमदार, भाजप

बंदीच्या विरोधात आवाज उठवण्याचे आश्‍वासन

(डावीकडे) आमदार श्री. हाळवणकर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १० सप्टेंबर (वार्ता.) – ‘सनातन बंदीचा विषय मला पूर्ण ठाऊक आहे. सनातन संस्थेवर कोणीही बंदी आणू शकत नाही. सनातन बंदीच्या विरोधात मी आवाज उठवीन’, असे आश्‍वासन येथील भाजपचे आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांनी ८ सप्टेंबरला येथे दिले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने श्री. सुरेश हाळवणकर यांना सनातनवरील संभाव्य बंदीच्या मागणी’च्या विरोधात निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी आमदार श्री. सुरेश हाळवणकर यांना ‘सांडपाणी अन् घनकचरा यांद्वारे होणार्‍या भयंकर प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून प्रशासनाद्वारे वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवातील कथित प्रदूषणाविषयी ‘कृत्रिम तलाव’, ‘गणेशमूर्तीदान’ आणि ‘कागदी लगद्याची गणेशमूर्ती’ या चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी विटंबना, तसेच जलप्रदूषण त्वरित थांबवण्यात यावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात