सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या मागे अन्वेषण यंत्रणांचा चौकशीचा वाढता ससेमिरा !

अशी चौकशी जिहादी आतंकवाद्यांची कधी केली आहे का ? राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणारे सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली छळ चालूच !

‘गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकरणांमध्ये अन्वेषण यंत्रणांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा चालू आहे. तसेच त्यांना या प्रकरणांमध्ये नाहक गोवण्याचा प्रयत्नही या अन्वेषण यंत्रणांकडून केला जात आहे. एका गावातील साधकाच्या पोलिसांनी केलेल्या चौकशीचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

एका गावातील एका साधकाच्या घरी जाऊन एका अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍याने चौकशी केली. चौकशीत साधकाचे पूर्ण नाव, शिक्षण, व्यवसाय, भ्रमणभाष क्रमांक आदी माहिती विचारली. या वेळी साधकाने योग्य ती माहिती दिली. त्यानंतर अधिकार्‍याने केलेल्या चौकशीतील संक्षिप्त वृत्तांत येथे देत आहोत.

अन्वेषण अधिकारी : आम्ही तुमच्याकडे कशासाठी आलो आहोत, ते समजले का ?

साधक : नाही. (‘एका जिल्ह्यातील साधकांची चौकशी’ असे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते, ते दैनिक साधकाने पोलिसांना दाखवले. त्यानंतर पोलिसाने पुढील प्रश्‍न विचारला.)

अन्वेषण अधिकारी : तुमच्याकडे कुणी चौकशीला आले का ? किंवा याविषयी काही विचारणा झाली का ?

साधक : नाही.

अन्वेषण अधिकारी : या बातमीच्या अनुषंगाने कुणाला पकडले असेल का ?

साधक : मला माहिती नाही.

अन्वेषण अधिकारी : तुम्ही आणखी काय काय करता ? सभा, मेळावे, जनजागृती अशा प्रकारे काय करता ?

साधक : व्यवसायामुळे वेळ देता येत नाही.

पोलीस : आणखी कोण येते ? साधकांची नावे सांगा.

साधक : विशेष कोणी येत नाही.

(पोलीस : त्या दोन महिला कोण आहेत ? त्यांची नावे काय ? (त्यांची नावे सांगितली.) तुमचा यात काही संबंध आहे काय ?

साधक : नाही.

पोलीस : चौकशीला बोलवल्यास याल का ?

साधक : हो, येतो.

(साधकाच्या दुकानात श्रीकृष्ण आणि एक संत यांंची प्रतिमा होती. त्यातील संतांकडे बोट दाखवून पोलिसांनी ‘हे कोण आणि काय करतात’, असे विचारले. त्या वेळी साधकाने त्या संतांचे नाव सांगितले.)

(जबाब लिहून झाल्यावर साधकांनी पोलिसांकडे त्याची एक प्रत मागितली. पोलिसांनी त्याची छायांकित प्रत काढून दिली.’)

सनातनच्या साधकांसह हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून चौकशी

काही शहरांमधील सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. याचा वृत्तांत लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात