सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध !

मुंबईत भांडुप, अंधेरी, धारावी आणि सानपाडा (नवी मुंबई) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) – नालासोपारा स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्या प्रकरण यांच्या अनुषंगाने मागील महिन्याभरात ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. यांपैकी कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित पुरोगामी, मुसलमान नेते आदी करत आहेत. दुसरीकडे मात्र कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांना सोयीस्करपणे पाठीशी घालण्याचा दुप्पटीपणा याचा ८ सप्टेंबर या दिवशी भांडुप, अंधेरी, धारावी आणि सानपाडा (नवी मुंबई) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनांद्वारे निषेध करण्यात आला.

या आंदोलनांमध्ये हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यासंह बजरंग दल, युवा हितकारणी, योग वेदांत समिती, विश्‍व हिंदु परिषद, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी), श्री शिवकार्य प्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा, वज्रदल पंचशील मित्रमंडळ, सिद्धीविनायक क्रीडा मंडळ, साईलीला मित्रमंडळ (भांडुप) या स्थानिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोपरखैरणे येथील आंदोलनाला पोलिसांनी अनुमती नाकारली !

९ सप्टेंबर या दिवशी कोपरखैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र पोलिसांनी या आंदोलनाला अनुमती नाकारली. (सनदशीरमार्गाने आंदोलन करण्यात येणार्‍या आंदोलनाला अनुमती नाकारणे, ही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची गळचेपीच होय ! – संपादक)

 

अंधेरी

गोरक्षक राऊत यांच्या घरी बॉम्ब मिळाले, हा दावा आम्हाला मान्य नाही ! – संदीप सिंग

अतिशय क्रूर अतिरेकीदेखील स्वतःच्या कुटुंबांचे प्राण धोक्यात घालून घरात बॉम्ब ठेवणार नाही. त्यामुळे अनेक वर्षे कायदेशीर मार्गाने गोरक्षणाचे कार्य करणार्‍या वैभव राऊत यांच्या घरी बॉम्ब मिळाले, हा आतंकवादविरोधी पथकांचा दावा आम्हाला मान्य नाही. याआधीदेखील साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित याच्यावर असेच आरोप केले गेले; मात्र ते निर्दोष सुटले; उलट त्यात आतंकवादविरोधी पथकाचा हात होता हे सिद्ध झाले.

सनातन संस्थेवर बंदीची मागणी, हे धर्मविरोधकांचे षड्यंत्र ! – सौ. नीता चव्हाण, सनातन संस्था

सनातन संस्था मागील २८ वर्षांपासून अध्यात्माच्या साहाय्याने ‘आनंदी जीवन कसे जगावे’, याचे शिक्षण देत आहे. त्यामुळे समाजातील लोक धर्माचरणी होऊ लागले आहेत. त्यामुळे सनातन संस्थेवर होत असलेली बंदीची मागणी हे धर्मविरोधी लोकांचे षड्यंत्र आहे.

लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांच्या
विरोधात केलेल्या कार्यालाही ‘हिंदु आतंकवाद’ म्हणणार का ? – रोहन पातेने, धर्मप्रेमी

देशातील विविध समस्यांच्या विरोधात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदूंचे संघटन करून विरोध करीत असल्यामुळे त्याला आतंकवाद म्हणत असतील; तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे संघटन करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या विरोधात हिंदूंचे संघटन केले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदु राष्ट्राचा जयघोष करीत हिंदूंचे संघटन करून इंग्रजांच्या गुलामगिरीला सुरूंग लावला, त्यालाही हिंदु आतंकवाद म्हणणार का ?

नक्षलवादी समर्थक असलेल्या तथाकथित विचारवंतांवर सरकारने कारवाई करावी ! – संतोष बंदरकर, धर्मप्रेमी

आतंकवाद, नक्षलवाद, लव्ह जिहाद, राष्ट्रविरोधी विचारसरणीचे खंडण आणि त्याविषयी जागृती करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणारे, भारताचे तुकडे करून पहाणार्‍यांचे आणि नक्षलवादाचे मात्र समर्थन करतात, त्यामुळे सरकारने अशा तथाकथित विचारवंत म्हणवणार्‍यांवर कारवाई करावी.

सनातन संस्थेचे निर्दोषत्व याआधी सिद्ध झाले असूनही तिला
पुन्हा अडकवण्यासाठी सनातनद्वेष्ट्यांची बंदीची मागणी ! – संकेत काणेकर

सनातन संस्थेवर होत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. याआधी देखील मडगाव, गडकरी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सनातनला अडकवण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रत्येक वेळी सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे. काही सनातनद्वेष्टे येनकेन प्रकारेण सनातन संस्थेला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या होत असलेली सनातन बंदीची मागणी त्याचाच भाग आहे.

क्षणचित्रे

१. पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले.

२. आंदोलनात घोषणा दिल्यावर विषय ऐकणारे नागरिकही घोषणा देत होते.

 

भांडुप

भ्रष्टाचारी लोकांना सनातन संस्था नको आहे ! – सागर चोपदार, मुंबई समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

विरोधक सनातनला विरोध का करत आहेत ? विखे पाटील यांनी शेतकर्‍यांचे पैसे खाल्ले, त्यांचा घोटाळा हिंदु विधीज्ञ परिषेदेनेे बाहेर काढला. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी झाकीर नाईकसारख्या आतंकवाद्याला ५० लाख रुपये दिले. प्रसारमाध्यमांवर सनातन संस्थेची बंदीची मागणी करणार्‍या या सर्वांची पार्श्‍वभूमी बघायला हवी. भ्रष्टाचारी लोकांना सनातन संस्था नको आहे. नक्षलवादी हे देशद्रोही असून धर्मप्रेमींना मात्र मुंबईत पोलीस चौकशीसाठी बोलावले जाते. हे सर्व षड्यंत्र आहे. या षड्यंत्राची आणि प्रसिद्धी माध्यमांची चौकशी व्हायला हवी.

  • ‘धर्माला ग्लानी आल्यावर मी अवतार घेतो’ या वचनाची प्रचीती ईश्‍वर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या माध्यमातून देत आहे. – श्री राजेश कार्येकर, धर्मप्रेमी
  • एल्गार परिषदेतील नेत्यांचा नक्षलींशी संबंध असूनही त्यांना नजरकैदेत, तर हिंदुत्वनिष्ठ पोलीस कोठडीत हा कुठला न्याय आहे ? – श्री. हरिदास जाधव, धर्मप्रेमी

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी हिंदुत्वनिष्ठांची धरपकड थांबवावी ! – श्री. सचिन घाग, साईलीला मित्र मंडळ, भांडुप

जेएनयूमध्ये अतिरेकी कारवाया होतात. त्यांच्यावर कार्यवाही न करता हिंदूंची एकजूट करणार्‍या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांची धरपकड पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी थांबवावी.

हिंदूंसाठी रचलेल्या षड्यंत्राच्या विरोधात कारागृह आणि न्यायालय
यांच्यापर्यंत संघर्ष करावा लागेल ! – अधिवक्ता संतोष दुबे, विश्‍व हिंदू परिषद, जिल्हा सहमंत्री

हिंदुत्वनिष्ठ, गोरक्षक, सनातन संस्था यांना खोट्या केसमध्ये अडकवले जात आहे. हिंदूंची एकजूट होऊ नये, हे विदेशी यंत्रणेचे षड्यंत्र आहे. यासाठी कारागृह ते न्यायालयापर्यंत संघर्ष करावा लागेल.

क्षणचित्र

४ नागरिक स्वतःहून त्यात सहभागी झाले.

 

सानपाडा

इशरत जहाँ आणि नक्षलवादी यांचे समर्थन करणार्‍यावर
कारवाई करावी ! – आधुनिक वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री यांनी सनातनचे नाव समोर आले नसल्याचे सांगूनही माध्यमे ते दाखवत नाहीत. यामधून त्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येते. आतंकवादी इशरत जहाँचे समर्थ करणारे आता नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत. अशा पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्यात यावी. न्यायालयाने सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता केली आहे, ते प्रसारमाध्यमे का दाखवत नाहीत ?

या देशात जे सहिष्णु आहेत, त्यांना आतंकवादी बोलले जात आहे ! – राजकुमार सिंग, गोरक्षक

बंगाल येथे दुर्गापूजाही करू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जे असहिष्णु होते ते निधर्मी झाले, तर जे सहिष्णु आहेत त्यांना आतंकवादी बोलले जात आहे, अशी देशाची स्थिती झाली आहे. जे हिंदु धर्माच्या विरोधात बोलतात, त्यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही.

क्षणचित्र

पोलिसांनी सर्व आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात