अकोला येथे सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

अकोला, ९ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्थेवरील बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईच्या निषेधार्थ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ते यांनी सहभाग घेतला. आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांच्या समर्थकांना विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आदी म्हणणार्‍यांचाही निषेध करण्यात आला.

या वेळी अधिवक्ता गणेश परियाल म्हणाले, ‘‘आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सनातन संस्थेच्या विरोधात जे षड्यंत्र चालवले आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. या निमित्ताने कोणतेही सहकार्य लागल्यास ते करण्यास मी तयार आहे.’’ शिवसेनेचे नगरसेवक श्री. शशी चोपडे यांनी सनातन संस्थेला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.

समाजातील लोकांनी स्वाक्षरी करून या आंदोलनाला तसेच संस्थेला पूर्ण पाठिंबा दिला. धर्माभिमानी सर्वश्री नागनाथ इंगळे, सौरभ शेंडे, शुभम ताले, रवि, अश्रय इंगळे, प्रेमनाथ शर्मा, रवि सारटे, संतोष सरफ, अनंता गाडेकर हे या आंदोलनात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात