परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मकार्यासाठी घेतलेले सतीचे वाण ‘व्रत’ म्हणून स्वीकारूया ! – भागवताचार्य वा.ना. उत्पात

सोलापूर येथे जनसंवाद सभा

भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे वय ७९ वर्षे असूनही ते सनातनविषयी सत्य  भूमिका मांडण्यासाठी सोलापूर येथील ‘जनसंवाद सभे’त प्रमुख वक्ता म्हणून सहभागी झाले. असे धर्माचे गाढे अभ्यासक असणार्‍या महनीय व्यक्तींचा आशीर्वाद आणि पाठबळ, हीच सनातनची शक्ती होय !

वा.ना. उत्पात

सोलापूर, ९ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु धर्म तर्कशुद्ध भाषेत मांडणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे ‘दैनिक सनातन प्रभात’ ! मराठी वृत्तपत्र क्षेत्रात दैनिक सनातन प्रभातमध्येच सत्याची बाजू मांडली जाते आणि त्यातूनच सत्यदर्शन घडते. सध्या चालू असलेल्या अपप्रचाराच्या वादळी वातावरणात केवळ ‘सनातन’चा दिवाच तेवत आहे. प्रसारमाध्यमांतून सनातनविषयी मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी धर्मकार्यासाठी सतीचे वाण घेतलेले आहे. आपणही या कार्यात सहभागी होऊन संतांचे हे वाण व्रत म्हणून स्वीकारूया, असे आवाहन भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी केले. येथे पुरोगाम्यांचे हिंदुविरोधी षड्यंत्र उघड करण्यासाठी झालेल्या ‘जनसंवाद सभे’त ते बोलत होते. या वेळी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही मनोगत व्यक्त केले.

भागवताचार्य वा.ना. उत्पात पुढे म्हणाले की, ‘ज्या हिंदुत्वनिष्ठांवर आरोप केले गेले, ते अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना दोषी म्हणता येणार नाही. आतापर्यंत संशयित म्हणून पकडलेल्यांची अनेक वर्षे कारागृहात गेली आणि पुराव्यांअभावी त्यांना सोडून देण्यात आले. त्यांची कारागृहातील वर्षे कोण भरून देणार ?’

मराठा मोर्चाचे सूत्र भरकटवण्यासाठी हिंदुत्वनिठांवर खोटे आरोप होत
आहेत ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर

सनातन संस्थेच्या अनेक कार्यक्रमांत मी सहभागी असतो. चांगले कार्य करतांना विरोध हा होणारच. केवळ राज्यात नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रात सूत्रबद्ध आणि संघटनात्मक कार्य केवळ सनातन संस्थेचे आहे. सनातनवर कितीही आरोप झाले तरी साधक निष्ठेने आणि श्रद्धेने सेवा करत आहेत, त्या निष्ठेला बळ देण्याचेे कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. मराठा मोर्च्याचे सूत्र भरकटवण्यासाठी हे खोटे आरोप होत आहेत. प्रसारमाध्यमांनी कितीही अपशब्द वापरले तरी त्याचा समाजमनावर परिणाम झालेला नाही, असे मनोगत ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी व्यक्त केले.

दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी उच्चन्यायालयात खटला चालवू नये
यासाठी याचिका का केली ? – अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी खटला चालवू नये, यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यावरून ‘त्यांना दाभोलकरांचे मारेकरी नकोत, तर केवळ सनातनला लक्ष्य करायचे’ एवढीच मानसिकता दिसून येते. जर डॉ. तावडे खुनी असतील, तर ते खटला चालवल्यावर सिद्ध होईल; पण निर्दोष व्यक्तीला खटला चालवून दोषी सिद्ध करता येणार नाही, हे माहिती असल्याने दाभोलकर-पानसरे कुटुंबीय आणि सीबीआय गेली २ वर्षे खटला चालू देत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात