निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय स्वार्थासाठी सनातनला विरोध होत आहे ! – संजय केळकर, आमदार, भाजप

ठाणे – सनातनचे कार्य चांगले आहे. निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राजकीय स्वार्थासाठी काही लोक विरोध करत आहेत. आता सध्यातरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात काय निकाल लागेल ते पाहू आणि पक्षाचे जे काही धोरण असेल, त्याप्रमाणे आम्ही कृती करू, असे प्रतिपादन येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री. संजय केळकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. सुनील घनवट यांनी नालासोपारा प्रकरण आणि सनातन बंदीच्या सद्यपरिस्थितीच्या संदर्भात त्यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी श्री. केळकर बोलत होते. या प्रसंगी श्री. घनवट यांनी सनातन संस्थेवर आणि त्यांच्या साधकांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे, हे एका निवेदनाद्वारे सविस्तरपणे त्यांना सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात