गुरुकृपायोगानुसार अष्टांग योगमार्गाने साधना केल्यास गुरुकृपा लवकर साध्य होते ! – योगेश शिर्के, सनातन संस्था

सहभागी युवक-युवती यांचा स्वभावदोष
आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेनुसार साधना करण्याचा निश्‍चय !

मुंबई येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळा !

दीपप्रज्वलन करतांना पू. (सौ.) संगीता जाधव, समवेत श्री. सुनील घनवट

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी युवकांनी योगदान द्यावे !
– सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ७ सप्टेंबर (वार्ता.) – देशात बहुसंख्य हिंदू आहेत, तसेच देशातील महत्त्वाच्या पदांवरही बहुसंख्य हिंदू असूनही हे हिंदु राष्ट्र घोषित होत नाही. जन्माने बहुसंख्य असूनही हिंदुत्वाचा विचार करणारे अल्प आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी, बलात्कार आदींच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकशाही निरर्थक ठरली आहे. त्यामुळे आदर्श राष्ट्राकरता हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव पर्याय आहे. अशा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ३ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुलुंड येथील मुलुंड सेवा संघ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी शंखनाद आणि त्यानंतर पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जान्हवी भदीर्के यांनी केले. या वेळी राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृतीपर ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रथम स्वत:मध्ये हिंदु राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, याची जाणीव सहभागी युवक-युवती यांना झाली. त्यासाठी त्यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनप्रक्रिया या समजून घेऊन त्याप्रमाणे साधना करण्याचा निश्‍चय केला.

गुरुकृपायोगानुसार अष्टांग योगमार्गाने साधना
केल्यास गुरुकृपा लवकर साध्य होते ! – योगेश शिर्के, सनातन संस्था

आत्मिक बळ वाढवण्यासाठी, ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक आहे. जीवनात काही वेळा अपेक्षित प्रयत्न करूनही यश मिळत नाही. दुःखाच्या पाठीमागे आध्यात्मिक कारण असते, हे मनुष्याच्या लक्षात येत नाही. त्यासाठी योग्य मार्गाने साधना होणे आवश्यक आहे. गुरुकृपायोगाच्या अंतर्गत अष्टांग योगमार्गाने साधना करतांना स्वतःमधील दोष आणि अहंकार यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्यास गुरुकृपा लवकर  साध्य होते.

दोष आणि अहं यांचे निर्मूलन करून स्वत:मध्ये गुणांची वृद्धी केल्यास
आदर्श व्यक्तीमत्त्व घडवता येते ! – सौ. जान्हवी भदिर्के, हिंदु जनजागृती समिती

अनेक कारणांमुळे मन तणावग्रस्त होऊन जीवनात नैराश्य येते. यासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व घडवणे आणि स्वत:मध्ये गुण वाढवणे यांसाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. घरात चोर शिरला की आपण त्याचे स्थान शोधतो. त्याप्रमाणे आपल्यातील दोषाचे स्थान हे मनात असते.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी ‘व्यापक धर्मकार्य करून हिंदूसंघटन कशाप्रकारे करू शकतो’ याविषयी, तर डॉ. लक्ष्मण जठार यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया कशा प्रकारे राबवायची’, याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत ‘दोषाची व्याप्ती कशी काढावी’ याविषयी सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले.

कार्यशाळेमध्ये गटचर्चाही घेण्यात आली. या वेळी राष्ट्र आणि धर्म कार्यात कशाप्रकारे सहभागी होऊ शकतो हे सांगण्यात आले.

स्वभावदोष-अहं निर्मूलन प्रक्रिया समजून घेतल्याने उपस्थितांना झालेला लाभ

१. कार्यशाळेमुळे सकारात्मकता वाढली. यामुळे अधिक जोमाने धर्मकार्य करता येईल.

– श्री. अमोल उतेकर, गोरेगाव

२. कार्यशाळा पुष्कळ शिस्तबद्ध होती. यामध्ये साधना आणि धर्मशिक्षण यांची माहिती मिळाली. स्वत:मधील स्वभावदोष लक्षात आले.

– सौ. भारती करंडे, जुईनगर.

३. माझ्याकडून देवाला समर्पित साधना होत नाही. देवाशी एकरूप होण्यासाठी मी कुठे अल्प पडत आहे ?, माझ्यातील कोणत्या स्वभावदोषांमुळे मी मागे रहात आहे ?, याची जाणीव मला या कार्यशाळेत झाली.

– कु. नेहा सतीश सावंत, सांताक्रूझ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात