सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही ! – रमेश बाबू, विहिंप, शिवमोग्गा

शिवमोग्गा येथील आंदोलन

आंदोलन करतांना धर्माभिमानी

शिवमोग्गा (कर्नाटक) – आज अनेक व्यक्ती हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. गौरी लंकेश हत्या प्रकरणात हिंदु युवकांना अटक करून त्यांचा अनन्वित छळ करत आहेत. अध्यात्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. याचा विश्‍व हिंदु परिषद, तसेच इतर सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र निषेध करतात. आम्ही सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे येथील नेते श्री. रमेश बाबू यांनी केले. ते येथे आयोजित करणार्‍यात आलेल्या आंदोलनात बोलत होते. समाजसाहाय्य आणि राष्ट्र हित यांचे कार्य करणार्‍या सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच इतर समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्यावर बंदी आणण्याच्या षड्यंत्राचा विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या वेळी विरशिवप्पनायग अभिमानी बळग, केसरी पडे, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २९० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. आंदोलनाच्या वेळी गरुडाने येऊन ३ प्रदक्षिणा घातल्या.

२. कप्पनहळ्ळी गावातून २५ ग्रामस्थ स्वयंप्रेरणेने आंदोलनाला आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात