पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन नक्षलवाद्यांच्या अटकेचे भक्कम समर्थन केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचा थयथयाट

(म्हणे) ‘पोलीस आयुक्तांना निलंबित करा !’

पुणे – दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेचा संबंध आढळतो; मात्र सरकारला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. माओवादी म्हणून कार्यकर्त्यांना अटक केली जाते, तेव्हा मात्र पोलीस सरकारचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलतात. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त आणि त्यांचे वरिष्ठ यांना निलंबित करा, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. (विखे पाटील यांचा हिंदुत्वाविषयीचा आकस आणि नक्षलसमर्थकांचा पुळका जनतेच्या समोर येत आहे. अशांना आगामी निवडणुकीत जनता घरीच बसवेल ! – संपादक)

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पुण्यात पोहोचली, तेव्हा ते बोलत होते. सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांनी पोलीस आणि सरकार यांना फटकारले आहे. खरे तर त्यांची या प्रकरणात लाजच गेली आहे. मुख्यमंत्र्यांनी किमान जनतेची क्षमायाचना तरी करावी, असे ते म्हणाले. (ज्या काँग्रेसवाल्यांना न्यायालयाने अनेक प्रकरणात फटकारले आहे, संपूर्ण जनतेने नाकारले आहे, त्यांनी इतरांची लाज काढणे याला ‘निर्लज्जतेचा कळस’ म्हणावे का ?  – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात