सनातन संस्थेवर बंदी येणार नाही ! – मदनभाऊ येरावार, पालकमंत्री, यवतमाळ

सनातनवर बंदीच्या मागणीच्या विरोधात यवतमाळ येथे पालकमंत्री मदनभाऊ येरावार यांना निवेदन

पालकमंत्री मदनभाऊ येरावार (बसलेले) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

यवतमाळ, ६ सप्टेंबर (वार्ता.) – येथील पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. मदनभाऊ येरावार यांना सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी ‘सनातन संस्थेवर बंदी येणार नाही’, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.

या वेळी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची अशास्त्रीय संकल्पना न राबवण्याचे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नवरात्रीच्या काळात अभिनेते सलमान खान यांच्या ‘लवरात्री’ चित्रपटाचे नाव पालटण्याविषयीचे निवेदनही समितीकडून देण्यात आले. ‘लवरात्री’ चित्रपटाविषयीच्या निवेदनावर त्वरित कार्यवाही करत ते निवेदन सांस्कृतिकमंत्री श्री. विनोद तावडे यांच्याकडे शेर्‍यासह पाठवण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात