(म्हणे) ‘सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव देहलीत कोणी दाबून ठेवला, याचा शोध घ्यावा लागेल !’ – पृथ्वीराज चव्हाण

पंढरपूर येथील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांची पुन्हा सनातनद्वेषी गरळओक !

स्वतःची सत्ता होती, त्या वेळी अनागोंदी कारभार करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना वैध मार्गाने राष्ट्र-धर्म कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्याचा काय अधिकार ?

पंढरपूर – सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आमच्या सरकारने वर्ष २०११ मध्ये केंद्राकडे पाठवला होता. देहलीत हा प्रस्ताव कुणी दाबून ठेवला, हे शोधावे लागेल. त्या वेळी केंद्रीय गृहमंत्रालयात सचिव असलेले आज केंद्रीय मंत्री आहेत, अशी गरळओक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. पृथ्वीराज चव्हाण हे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथे आले होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिन सावंत, राजू वाघमारे, आमदार भारत भालके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (पानीवकर) आदी उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले की,

१. सनातनवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाविषयी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी याविषयी अधिक माहिती मागवली असता वर्ष २०१४ मध्ये १ सहस्र पानांची अधिक माहितीही पाठवली होती.

२. तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत प्रस्ताव पोहोचला नसावा, असे दिसते. केंद्रीय गृहमंत्रालयात सचिव, उपसचिव आणि इतर २०० अधिकारी आहेत. त्यांच्याकडे कुठे ही धारिका अडकून पडली, हे पहावे लागेल.

३. श्री विठ्ठल देवस्थानच्या ठिकाणी दर्शनाचा काळाबाजार होत असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. एकटा माणूस असा प्रकार करू शकणार नाही. (काँग्रेस सरकारच्या काळात हिंदूंच्या अनेक मंदिरांचे सरकारीकरण करून भ्रष्टाचार्‍यांना मोकळीक देणार्‍या काँग्रेसवाल्यांनी दर्शनव्यवस्थेतील काळ्या बाजाराविषयी बोलणे हास्यास्पद ! – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात