(म्हणे) ‘आठवले याची बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून टाकू !’ – लक्ष्मण माने यांची धमकी

  • अशी धमकी देणारे लक्ष्मण माने यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. 
  • हिंसा कोण घडवते, हे माने यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते.

नवी मुंबई – आठवल्याची (सनातनचे संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून टाकू, अशी जाहीरपणे धमकी (कु)विचारवंत लक्ष्मण माने यांनी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महामेळाव्यात दिली. या वेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

माने पुढे म्हणाले की,

१. आम्ही आमची ४ माणसे गमावली आहे. यापुढे ५ वा माणूस गमवणार नाही, मग जे काही होईल ती १९४८ ची पुनरावृत्ती होईल, ती करायची नसेल तर आमच्या वाटेला जाऊ नका. पुन्हा आमच्यावर चाल कराल किंवा सूची बनवायला लागाल, तर त्या आठवल्याची बिल्डिंग (सनातन आश्रम) साडेतीन मिनिटांत तोडून टाकू.

२. असला नाद आमच्याशी करायचा नाही, तो (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) ऊठसुठ मुसलमानांना भीती दाखवतोय. आम्ही मुसलमानांच्या बरोबर आहोत, तुमच्या मशिदीकडे येऊ द्या कोण, आम्ही पहिले तुमच्या मशिदीवर चढून बसू. कोण तुमच्या मशिदीला हात लावतो तेच पहातो. हे संरक्षण आपण त्यांना दिले पाहिजे.

३. मुसलमानांसह इतरांनाही संविधानाने एकत्र ठेवले आहे; पण हे आम्हाला दुर्जन म्हणतात. हा आठवले शहाणा कोणाला तोंड दाखवत नाही, अरे लक्ष्मण माने रोज लोकांमध्ये आहे आणि तू चार भिंतीच्या आत स्वत:ला कोंडून घेतले आहे. हिंमत असेल, तर ये येथे स्टेजवर आणि काय तुझी अक्कल पाजळायची ती पाजळ. पत्रकारांनाही त्या इमारतीत जाता येत नाही.

४. बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) आपण जावूया का केव्हा तरी या इमारतीत ? हे करायलाच पाहिजे. गोव्याची ती फोंड्याला इमारत आहे. तेथे जायलाच कोणाला देत नाही. एकदा तेथे जायलाच पाहिजे. हा खूप कारस्थाने करत आहेत आणि सरकार गप्प बसत आहे. सरकार एवढं त्याला घाबरत आहे. आम्ही सगळे वैैकाडी, रामोशी माकडवाले कोणाला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला आदेश द्या त्याच (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) काय वाकड करायच ते करतो. कसली कपट कारस्थान करता. अरे बापाने काढले असेल, तर असली कपट कारस्थान करावी लागत नाही. (संतांवर अतिशय हीन शब्दांत टीका करणारे लक्ष्मण माने यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे. – संपादक)

५. त्या भिड्याला अटक करा म्हणून बाळासाहेब मागे लागले आहेत. भिडे म्हणतो आंबे खाऊन पोरं होतात. डझनभर आंबे भिड्यालाच खायला घाला. इतके नालायक लोक जगात सापडायचे नाही.

६. रा.स्व. संघाकडे शस्त्र कोठून आली, याची चौकशी करण्यात यावी. आमचा पक्ष नोंदीत आहे. रा.स्व. संघाची कुठे नोंदणी आहे, ते सांगा. सारा चोरीचा मामला आहे. त्यामुळे मी यांना दरोडेखोर म्हणतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात