सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी जनमानसात वाढलेली विश्‍वासार्हता, ही त्यांची अपकीर्ती करू पहाणार्‍यांना चपराक !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती
समिती यांविषयी जनमानसात वाढलेली विश्‍वासार्हता

‘एखाद्या संस्थेविषयी जनमानसात किती आपुलकी, प्रेम आणि विश्‍वास आहे, यावरून त्या संस्थेची विश्‍वासार्हता लक्षात येते. नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमे, (अ)विचारवंत, निधर्मीवादी आदींनी सनातनची अपकीर्ती करण्याची एकही संधी सोडली नाही. असे असले, तरी समाजात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी असलेला विश्‍वास न ढळता उलट तो वृद्धींगत झाल्याचे दिसून आले. याविषयीचे अनुभव खाली दिले आहेत.

 

१. सनातनचे कार्य ठाऊक असल्याने दूरचित्रवाहिनीवरून
सनातनविरोधी वृत्तांचा परिणाम होत नसल्याचे सांगणारे सनातन प्रभातचे वाचक !

‘साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचकाने सांगितले, ‘दूरचित्रवाहिनीवर जे काही चालले आहे, त्याचे आम्हाला काही वाटत नाही. आता निवडणुका येत आहेत ना ! त्यामुळे विरोधक वातावरणनिर्मिती करत आहेत. आम्हाला सनातनचे सर्व कार्य ठाऊक आहे.’ हे सर्व ऐकून समाजाचा सनातन संस्थेविषयीचा विश्‍वास वृद्धींगत झाल्याचे लक्षात आले. – सौ. प्रतिभा चव्हाण, कणकवली, सिंधुदुर्ग.

 

२. सनातनवर होत असलेले आरोप, हे सनातन धर्म
संपवण्यासाठी रचलेले षड्यंत्र असल्याचे सांगणारे सरपंच !

‘१ सप्टेंबर २०१८ या दिवशी देवगड तालुक्यातील पडेल या गावी ‘गणपति’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनात गावचे सरपंच तथा सेवानिवृत्त शिक्षक श्री. विकास दीक्षित यांनी सनातन संस्थेविषयीचे मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केले. ‘सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी संस्था असून तिच्यावर होत असलेले आरोप हे सनातन धर्म संपवण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे. लोकांचे मनोबल खच्ची करण्यासाठी हे आरोप होत असून त्यात तथ्य नाही’, असे त्यांनी सांगितले. श्री. दीक्षित हे साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक आहेत.’ – सौ. ज्योत्स्ना नारकर, पडेल, देवगड, सिंधुदुर्ग.

 

३. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभांच्या वेळी
तणाव विरहित रहाता येत असल्याचे सांगणार्‍या महिला पोलीस !

‘ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेच्या ठिकाणी सेवा करतांना तेथे ३ महिला पोलीसही उपस्थित होत्या. मान्यवर वक्ते त्यांच्या भाषणात आझाद मैदानात झालेल्या दंगलीत महिला पोलिसांवर झालेल्या अत्याचारांविषयी माहिती सांगत होते. तेव्हा त्या महिला पोलीस आपापसांत चर्चा करतांना म्हणाल्या, ‘‘केवळ हेच वक्ते आपल्यावर (सहकारी महिला पोलिसांवर) झालेल्या अत्याचारांविषयी बाजू मांडतात.’’ नंतर त्यांपैकी एक महिला पोलीस मला म्हणाली, ‘‘केवळ तुमच्याच कार्यक्रमात आम्ही तणाव विरहित असतो आणि निवांत बसू शकतो.’’ नंतर त्यांनी आम्हा साधिकांची प्रेमाने विचारपूस केली.’ – सौ. मानसी उथळे, पनवेल, रायगड. (हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यक्रमांना साध्या वेशात उपस्थित रहाणार्‍या पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)

 

४. प्रवासात गुन्हे अन्वेषण विभागातील एकाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती
समिती यांच्याविषयी शंका उपस्थित केल्यावर ‘सनातन शुद्ध आहे’, असे ठामपणे सांगणारा प्रवासी !

‘३० ऑगस्ट २०१८ या दिवशी मी आणि साधक रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते गोव्यातील मडगाव असा प्रवास करत होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे एक गृहस्थ गोव्याला जाण्यासाठी चढलेे. ते गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. आम्ही प्रथमोपचार ग्रंथ वाचत होतो. तोे पाहून ते लगेच मोठ्या आवाजात, ‘‘कुठे जाताय ? समाज, तसेच दूरचित्रवाहिनी यांवर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी किती आकांडतांडव केला जात आहे …?’’ मी बोलणार तितक्यात शेजारच्या बाकावर बसलेले गृहस्थ त्वरित म्हणाले, ‘‘अरे सनातन तर शुद्ध आहे. सनातनला उगाच त्रास देत आहेत. ते तर षड्यंत्रच आहे. मी श्री. वैभव राऊत यांनाही चांगला ओळखतो. ते खरे तर निर्दोषच आहेत.’’ श्रीकृष्णाच्या माध्यमातून त्या प्रवाशानेच हे उत्तर दिले. याविषयी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’’ – श्री. शैलेश लक्ष्मण सकपाळ, खेड, रत्नागिरी.

 

५. सनातनला विरोध करणारे कार्यालयातील विरोधक
घरी आल्यावर त्यांना घरात चैतन्य जाणवून ते सकारात्मक होणे !

५ अ. सनातनविषयी येणार्‍या विरोधी बातम्या पाहून धर्मप्रेमीला सनातन संस्था सोडून देण्यास कार्यालयातील विरोधकांनी सांगणे 

‘सनातनविषयी प्रतिदिन दूरचित्रवाहिनीवर बातम्या पाहिल्यावर यजमानांच्या कार्यालयातील सहकर्मचारी त्यांना प्रतिदिन सांगायचे, ‘‘या संस्थेचा नाद सोडून द्या. उगाच तुम्हालासुद्धा पोलीस पकडून नेतील. तुमची चाकरीही जाईल. आयुष्याचा नाश होईल.’’ यावर माझ्या यजमानांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

५ आ. विरोधकांना धर्मप्रेमींच्या घरात चैतन्य जाणवणे आणि तेथून जावेसे न वाटणे !

नंतर ४-५ दिवसांनी तेच सहकर्मचारी आमच्या घरी आले. त्यांनी घरामध्ये पूज्यपाद संतश्री आसारामबापूजी आणि भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा पाहिली. नंतर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘या सगळ्यांविषयी (पूज्यपाद आसारामजीबापू आणि सनातन संस्था यांच्याविषयी) प्रसारमाध्यमांमध्ये इतके वाईट दाखवले जाते, तरीसुद्धा तुमच्या घरात इतके चैतन्य कसे ? आम्हाला तुमच्या घरातून जाण्याची इच्छाच होत नाही. इथले चैतन्य ग्रहण करत रहावेसे वाटते.’ – सौ. शितल सुर्वे, धर्मप्रेमी, पुणे.

६. सनातनचे सर्व चांगले असल्याने त्याच्या पाठीशी असल्याचे नातेवाईकाने सांगणे !

नालासोपारा येथे स्फोटके सापडल्याच्या कथित प्रकरणानंतर मला एका नातेवाईकाने विचारले, ‘‘तुमच्या सनातनविषयी दूरचित्रवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांत जे लिहिले-दाखवले जाते, त्यात काय खरे आहे ?’’ त्या वेळी मी त्यांना ‘तुम्हाला काय वाटते ?’, असे विचारले. ते म्हणाले, ‘‘तुमचे, सनातनचे सर्व चांगले आहे. आम्हाला ठाऊक आहे. आम्ही सनातनच्या पाठीशी आहोत.’’ – सौ. अदिती ज्ञानेश्‍वर बेहरे, आरवली, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.