‘ध’चा ‘मा’ करून वृत्ते प्रसारित करणार्‍यांना नव्हे, तर जिज्ञासूंना सनातन आश्रम नेहमीच खुला !

सनातनचा आश्रम आणि कार्य

श्री. वीरेंद्र मराठे

सनातनच्या विरोधात जरा जरी ‘खुट्’ झाले की, प्रसारमाध्यमातील सनातनद्वेषाने पछाडलेले काही प्रतिनिधी त्यांचा मोर्चा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाकडे वळवतात. ‘आम्हाला डॉ. आठवलेंना भेटायचे आहे’, ‘आश्रमातील साधकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत’, ‘आश्रमात काय चालते, ते बघायचे आहे’, अशा आशयाचे प्रश्‍न विचारून अतिशय उद्दामपणे आश्रमात प्रवेश मिळण्याविषयी विचारतात. ‘आम्हाला सनातनच्या आश्रमात का प्रवेश दिला जात नाही ?’, असे प्रश्‍न विचारतात. सतत सनातनला जाब विचारणार्‍या पत्रकारांनी प्रथम खालील प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत.

‘सनातनच्या साधकांच्या सौजन्याचा अपलाभ घेऊन आश्रमाविषयी विपर्यस्त वृत्ते का छापली’, याचे उत्तर पत्रकार देतील का ?

यापूर्वी अनेकदा पत्रकारांच्या विनंतीला मान देऊन त्यांना पनवेल आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रवेश देण्यात आला. प्रत्येक वेळी साधकांच्या सौजन्याचा अपलाभ घेऊन वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सनातनच्या आश्रमाविषयी विपर्यस्त वृत्त छापले. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा खोटेपणा लक्षात यावा, यासाठी काही निवडक उदाहरणे येथे देत आहोत…

१. वर्ष २००९ मध्ये ‘सीएन्एन् १८’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर, स्वयंपाकघर आणि इतर विभागांचे चित्रीकरण केले. नंतर वृत्त प्रसारित करतांना साधक आरती करतांनाचे दृश्य दाखवण्यात आले. ते दाखवत असतांना ‘आश्रमातील साधक आरतीच्या वेळी टाळ वाजवत होते; मात्र हा दिखाऊपणा आहे’, अशी टीका करत साधकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न केला.

२. वर्ष २०१५ मध्ये ‘एबीपी माझा’च्या पत्रकाराला आश्रमात प्रवेश देऊन त्याला आश्रमदर्शन करण्यात आले. त्या वेळीही कॅमेरामनने कॅमरा चालू ठेवून ध्वनीचित्रीकरण केले. तसेच याविषयी विपर्यस्त वृत्त प्रसारित करण्यात आले.

३. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या मुंबई मिररच्या पत्रकार अलका धूपकर यांना आश्रम दाखवण्यात आला. त्या दैनिकात वृत्त प्रसिद्ध करतांना मात्र ‘आश्रमात मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात’, असे मानहानीकारक वृत्त प्रसिद्ध केले.

इतर वेळी व्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे ‘सनातनच्या साधकांनाही ते लागू आहे’, हे विसरतात !

पुरो(अधो)गामी पत्रकार ‘व्यक्तीस्वातंत्र्य’, ‘विचारस्वातंत्र्य’, ‘घटनादत्त अधिकार’ आदींविषयी भरभरून बोलतात. सनातनच्या साधकांच्या ‘बाईट’ घेण्याच्या नावाखाली आश्रमात येऊ इच्छिणारे पत्रकार ‘सनातनच्या साधकांनाही ‘त्यांनी कोणाशी बोलावे, कोणाशी बोलू नये’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हे सोयीस्करपणे विसरतात.

जिज्ञासूंचे सनातनच्या आश्रमात नेहमीच स्वागत !

‘सनातनच्या आश्रमात अधिवक्ता शिबिर, हिंदुत्वनिष्ठ पत्रकार-संपादक शिबिर, प्रथमोपचार शिबिर आदींचे आयोजन केले जाते. या शिबिरांना देशभरातील हिंदुत्वनिष्ठ उपस्थित असतात. शिबिराच्या काळात हे हिंदुत्वनिष्ठ आश्रमातील कुटुंबाचा भाग बनून सहजतेने वावरत असतात.

‘जिज्ञासू हा ज्ञानाचा अधिकारी असतो’, हे अध्यात्मातील वचन आहे. आश्रमातील दैवी कार्य जाणून घेण्याची तळमळ असणार्‍या सर्वांचेच आश्रमात नेहमीच स्वागत केले जाते. आताच्या निधर्मी आणि पुरो(अधो)गामी पत्रकारांमध्ये ही जिज्ञासा दिसून येत नाही. असे असतांना स्वतः अंतर्मुख होऊन विचार न करता, तसेच आतापर्यंत पत्रकारांनी केलेल्या अक्षम्य चुकांविषयी खंत न बाळगता ‘आश्रमात प्रवेश देत नाहीत’, असे सांगत थयथयाट करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा होय !’

सनातन संस्थेने दाखवलेल्या सौजन्याचा अपलाभ घेऊन पत्रकारांनी साधक आणि आश्रम यांच्याविषयी कपोलकल्पित कथा अनेक वेळा रचल्याचा कटू अनुभव सनातन संस्थेला आला आहे. याच कारणामुळे नाईलाजाने सनातन आश्रमाच्या विश्‍वस्तांना पत्रकारांना आश्रमात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागला !

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

रामनाथी आश्रम हे दैवी शक्तींचे स्थान असून येथे आल्यावर माझे राष्ट्रप्रेम जागृत झाले !

‘रामनाथी आश्रम हे दैवी शक्तींचे स्थान आहे. येथे विविध प्रकारच्या शक्तींचा मानवावर होणार्‍या परिणामांचा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. विविध शक्तींच्या प्रकटीकरणामुळे दृश्य स्वरूपातील त्यांचे परिणामही पहायला मिळाले. येथे आल्यावर माझे राष्ट्रप्रेमही जागृत झाले !’ – डॉ. नवीन आनंद (युनायटेड नेशन्स, देहली आणि वर्ल्ड बँक यांचे सल्लागार), डेहराडून (४.२.२०१८)

 

उत्कृष्ट व्यवस्थापन आणि यंत्रही मोजू शकणार नाही, इतकी सकारात्मक ऊर्जा असलेला सनातनचा रामनाथी, गोवा येथील आश्रम !

‘मी ‘आयआयटी’ आणि ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतो. मी त्यांना पुष्कळदा सांगतो, ‘माझ्या बरोबर सनातनमध्ये चला. व्यवस्थापन पहायचे असेल, ऊर्जा अनुभवायची असेल, तर सनातनच्या आश्रमात चला. तेथे सर्वकाही मिळेल. तेथे कोणाच्याच तोंडवळ्यावर ताण नसतो. ‘कोणाविषयी अविश्‍वास आहे’, असे वाटतच नाही. तेथील सकारात्मक ऊर्जा मोजायची झाली, तर ऊर्जा मोजण्याचे यंत्रही नापास होईल, इतकी सकारात्मक ऊर्जा आहे ! (यंत्र मोजू शकणार नाही, इतकी सकारात्मक ऊर्जा आश्रमात आहे.)’ – श्री. राजेंद्र अलख, संस्थापक, ब्रह्मांडीय आध्यात्मिक उपचारी संघ, मुंबई, महाराष्ट्र.

 

फेसबूक या सामाजिक माध्यमांवरून धर्माभिमानी हिंदूंनी सनातन संस्थेला दिलेला जाहीर पाठिंबा !

… तर हिंदुद्वेष्ट्यांच्या घशाला कोरड पडली असती !

‘आधुनिकता आणि धर्मनिरपेक्षता यांमध्ये आकंठ बुडालेल्या व्यक्तीने जर हिंदुत्व विनाशाचा चष्मा डोळ्यांवर घातला असेल, तर बुद्धी अन् विचार मलीन आणि पतित होतात. सनातन संस्था जर इसिस आणि तालिबान यांसारखी असती, तर सनातनचे लाखो साधक एवढे बोलल्यावर त्यांच्या (हिंदुद्वेष्ट्यांच्या) घशाला कोरड पडली असती.’ – अधिवक्ता त्रिपाठी

भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय वरिष्ठ नेत्यांना संबोधित करत एका जिज्ञासूने केलेले ट्वीट !

‘जर महाराष्ट्र पोलीस हे कुठल्याही ठोस पुराव्याशिवाय अन्वेषण करत असेल, तर भाजपने खात्री धरावी की, वर्ष २०१९ च्या निवडणुकांमध्ये हे त्यांच्यावर उलटेल ! वर्ष २००४ सारखी भाजपची गत होऊ देऊ नका !’ – एक जिज्ञासू

पत्रकार निखिल वागळे यांच्या सनातनद्वेष्ट्या ट्वीटवर व्यक्त केलेली प्रतिक्रिया !

‘निखिल वागळे, तुम्ही स्वतःच्या पायावर कुर्‍हाड कशाला मारून घेत आहात ? तुमची विधाने नेहमीच हिंदुविरोधी असतात. लोकांच्या ते पुन:पुन्हा का लक्षात आणून देता ? परात्पर गुरु

डॉ. आठवले संपूर्ण जगाला आध्यात्मिक साधना शिकवून ते करण्यास प्रवृत्त करत आहेत. एकूण प्रकरण पहाता एक भाग असाही लक्षात येत आहे की, पोलिसांवर राजकीय पक्षांचा दबाव असेलच… !’ – श्री. नागराजू गुज्जेटी

अंनिसवाल्यांना सत्य जाणून घेण्यात काहीच रुची नाही !

‘या अंनिसवाल्यांना सत्य जाणून घेण्यात काहीच रुची नाही ! केवळ त्यांचे घोटाळे उघड करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणायची आहे. दाभोलकरांचे हत्यारे कोणीही असो, याच्याशी त्यांचे देणेघेणे नाही.’ – ममता देसाई

‘सनातन हीच हिंदूंची खरी हितैषी !’ – प्रीतम मादवी

 

सनातनला ‘आतंकवादी’ ठरवण्याचे षड्यंत्र वारंवार उघड झाले असतांनाही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारी सनातनद्वेष्टी प्रसारमाध्यमे !

१. मडगाव स्फोटाच्या प्रकरणात विशेष न्यायालयाच्या न्यायाधिशांनी ‘पोलिसांनी नोंद केलेला प्रथमदर्शी अहवाल हा केवळ सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूने बनवला होता, हे दिसून येते’, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

२. ठाणे स्फोटाच्या प्रकरणात निर्णय देतांना ‘पोलिसांनी ठाणे स्फोटाचा केलेला तपासच संशयास्पद होता’, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते.

या दोन्ही प्रकरणांतील न्यायालयाचे आदेश उपलब्ध आहेत. ते वाचण्याची तसदी प्रसारमाध्यमे का घेत नाहीत ? ‘सनातनची अपकीर्तीच करण्याची एकही संधी सोडायची नाही’, हे प्रसारमाध्यमांनी निश्‍चित केल्यामुळेच प्रसारमाध्यमांना वारंवार सनातनद्वेषाची उबळ येते, हेच प्रसारमाध्यमांनी सनातनच्या विरोधात वारंवार केलेल्या वृत्तांकनातून वारंवार अधोरेखित होते !

सनातन संस्थेचा आर्थिक व्यवहार धर्मादाय आयुक्तांनी पूर्णपणे तपासला आहे. यामध्ये त्यांना काहीच त्रुटी मिळाल्या नाहीत.

 

विविध शहरांत ‘आम्ही सारे सनातन’चा उद्घोष करून सनातनला दर्शवला प्रचंड पाठिंबा !

नालासोपारा प्रकरणानंतर सनातनवर बंदी घालण्याच्या संदर्भात हिंदुविरोधी पक्ष, पुरो(अधो)गामी आणि माध्यमे यांनी सनातनच्या विरोधात कलुषित वातावरण निर्माण केल्यानंतर सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आणि हिंदुत्वनिष्ठांची नाहक अपकीर्ती केल्याच्या कारणावरून विविध शहारांमध्ये मोर्चे काढण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि सनातनचे हितचिंतक यांनी प्रचंड प्रमाणात सनातनला भरघोस पाठिंबा देऊन ‘आम्ही सारे सनातन’चा उद्घोष केला !

संभाजीनगर : २०० हून अधिक

जळगाव : ३०० हून अधिक

पुणे : ४०० हून अधिक

कोल्हापूर : ४५० हून अधिक

पनवेल : ५०० हून अधिक

सातारा : १ सहस्रांहून अधिक

ठाणे : १ सहस्र २०० हून अधिक

या जनसमुदायाचा आवाज हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा हुंकार !

 

वाचकांना आवाहन !

ज्यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्थांविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे किंवा कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे, तसेच जे दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होऊ इच्छितात त्यांनी ९३२२३ १५३१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘सनातन सत्यदर्शन’ हा अंक गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी येणार्‍या पाहुण्यांना देणे, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी भाविकांना दिसेल अशा स्वरूपात मंडपात प्रदर्शित करण्यासाठी देणे, तसेच तेथील सनातनच्या वितरण केंद्रावर ठेवणे आदींच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.