हिंदुत्वनिष्ठांचा नाहक छळ करणार्‍या तपासयंत्रणा संशयाच्या भोवर्‍यात !

तपासयंत्रणांतील त्रुटी

डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यापासून आजतागायत विविध तपासयंत्रणांनी केलेल्या तपासाविषयी अनेक प्रश्‍नचिन्हे निर्माण होतात. तपासयंत्रणांच्या काही कृती संशयास्पद वाटतात, तसेच तपासातील त्रुटीही पुढे येतात. मालेगाव प्रकरणातही तपासयंत्रणांनी केलेली फसवेगिरीची भयावहता उघड झाली. सरकार आणि पुरो(अधो)गामी यांच्या दबावाखाली तपासयंत्रणा हिंदुत्वनिष्ठांना नाहक गोवून पापाच्या धनी होत आहेत.

 

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासप्रकरणी निर्माण होत असलेले काही गंभीर प्रश्‍न !

या प्रकरणात आरंभी सनातनच्या अनेक साधकांची चौकशी केली होती. काही साधकांना या हत्येला उत्तरदायी धरण्यात आले. नंतर अन्य काही साधकांची नावे घेऊन ते फरार असल्याचे आणि मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले गेले अन् आता अटक केलेले दोघे जण हे वेगळेच निघाले, त्याचे काय ?

  • दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल ज्यांच्याकडे मिळाले, ते नागोरी आणि खंडेलवाल यांचे काय ? या प्रकरणात सनातनच्या विविध साधकांची नावे घेतली, त्यांचे काय ?
  • डॉ. दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल सापडलेले नागोरी-खंडेलवाल यांच्या जामिनाला दाभोलकर परिवाराने विरोध का केला नाही ?
  • ‘२५ लाख देतो, गुन्हा कबूल कर’, असे नागोरीला सांगणार्‍या राकेश मारियांना प्रश्‍न का विचारले गेले नाहीत ?
  • दाभोलकर हत्येचा खटला चालवला जाऊ नये, यासाठी दाभोलकर परिवार उच्च न्यायालयात का गेला ?
  • दाभोलकर हत्येप्रकरणी वापरलेले पिस्तुल पोलिसांकडे असतांना त्याच पिस्तुलातून पानसरेंची हत्या केली, असा अनाठायी आरोप केला गेला. यास्तव ‘स्कॉटलॅण्ड यार्ड’कडून रिपोर्ट येण्याची वाट पहाण्याच्या नावाखाली उच्च न्यायालयाची ९ महिने गंभीर फसवणूक केली गेली, याविषयी सर्वजण मूग गिळून गप्प का बसले ?
  • ‘अंनिस’चे नाव नक्षलवादाशी संबंधित संघटनांमध्ये असल्याचा गृहमंत्रालयाचा अहवाल असूनही त्या दिशेने तपास का केला नाही ?

 

गौरी लंकेश आणि पानसरे हत्या प्रकरणी संशयित
आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थित केलेले सूत्र !

गौरी लंकेश हत्या प्रकरणात संशयितांची नकली वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. पोलीस न्यूनतम २ घंटे लागणारी वैद्यकीय तपासणी १५ मिनिटांत उरकत आहेत. एका पुरोगाम्याची हत्या झाली, तर त्यावर कोक्कासारख्या गंभीर कायद्यांतर्गत कारवाई करण्यास कर्नाटक सरकार तत्पर आहे; मात्र आतापर्यंत ८ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या राज्यात झाल्या आहेत, त्याविषयी सरकार काहीच कृती करत नाही. या प्रकरणात निर्दोष कार्यकर्त्यांना नाहक गोवण्यात येत आहे. अन्वेषण कशा पद्धतीने भरकटवले जात आहे, याचे हे उदाहरण आहे !

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

 

नालासोपारा प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने
शस्त्रसाठा किंवा तत्सम साहित्य उघडपणे का दाखवले नाही ?

बंगाल पोलिसांनी एका प्रकरणात जप्त केलेला शस्त्रसाठा जसा दाखवला आहे, तसा आतंकवादविरोधी पथकाने नालासोपारा प्रकरणात जप्त केलेला कथित शस्त्रसाठा का दाखवला नाही ? गोरक्षकश्री. वैभव राऊत यांच्याकडे कथित शस्त्रसाठा सापडल्यानंतर थयथयाट करणारी प्रसारमाध्यमे बंगालमधील घटना घडून ५ दिवस झाले, तरी गप्प होती ! बंगालमध्ये एका धर्मांध विद्यार्थ्यांकडे शस्त्रसाठा सापडणे, ही प्रसारमाध्यमांना ‘ब्रेकिंग न्यूज’ वाटत नाही, यातच सर्वकाही आले !

 

‘तपासयंत्रणांना का लक्ष्य करत आहात ?’ याला
सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिलेले बिनतोड उत्तर

तपासयंत्रणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न मुळीच नाही. उलट निष्पक्ष आणि दबावविरहित तपास व्हावा, ही आमची इच्छा आहे; पण संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे बातमी सकाळने प्रकाशित केली आहे, त्यावरून सनातनलाच तपासयंत्रणा लक्ष्य करत आहेत; म्हणून त्यांच्या या चुकीच्या कृत्याविषयी सनातनने आवाज उठवला, तर त्यात गैर काय ? यापूर्वीचा एटीएस्चा इतिहास कलंकित आहे.

१. मालेगाव स्फोट २००६ प्रकरणी मुसलमानांच्या घरी बॉम्ब ठेवून ६ निष्पाप मुसलमानांना त्यांनी लक्ष्य केले होते.

२. मालेगाव स्फोट २००८ मध्ये सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी एटीएस्चे शेखर बागडे यांनी आर्डीएक्स ठेवले (‘प्लांट’  केले) होते.

३. हे सर्व एन्आयएने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मंडळींना जामीन मिळाला आहे.

 

एटीएस् ‘डॉझियर’ जाहीर का करत नाही ?- सनातनचा प्रश्‍न

तपासयंत्रणांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

यापूर्वीही एटीएस्ने डॉझियर ‘सबमीट’ केले होते. त्याचे उत्तर आम्ही दिले होते. एटीएस्ने जे डॉझियर ‘सबमीट’ केले आहे, ते जाहीर करावे. तसेच तपासयंत्रणांनी मुंबई उच्च न्यायालयात जे काही १४-१५ वेळा गुप्त अहवाल दिले आहेत, तेही जाहीर करावेत. आम्ही त्याची उत्तरे जाहीर करू. किती दिवस गोपनीयतेच्या नावाखाली तुम्ही सनातनची मानहानी करणार आहात ?

 

सचिन अंधुरे यांना अटक केल्यावर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी उपस्थित केलेली सूत्रे

या विषयी माहितीसाठी वाचा 

 

अशी आहे आतंकवादविरोधी पथकाच्या
कारवाईविषयी संशय निर्माण करणारी सूत्रांची मालिका !

या वृत्तातील सत्यतेविषयी आतंकवादविरोधी पथकातील प्रमुखांनी खुलासा करायला हवा !

यापूर्वी आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, त्यानंतर याच पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी वर्ष २०११ मध्ये, त्यानंतर प्रमुख झालेले हिमांशू रॉय यांनी वर्ष २०१५ मध्ये सनातनवर बंदी घालण्याची कागदपत्रे बनवून सरकारकडे दिली होती. ही कागदपत्रे केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत, असेही वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. यातून आतंकवादविरोधी पथकाची संशयास्पद कार्यपद्धत लक्षात येते ! गोपनीयतेच्या नावाखाली सनातन आणि अन्य संघटना यांची अपकीर्ती करून समाजाची दिशाभूल करणार्‍या आतंकवाद विरोधी पथकावर आणि गृहखाते यांच्या अधिकार्‍यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई केली पाहिजे !

अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य पुढे येईल ! – आतंकवादविरोधी पथक

एका आरोपीने जरी डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट केले असले, तरी ही माहिती केवळ त्याने दिली आहे. अन्वेषणामध्ये आरोपी अशा दहा गोष्टी सांगतात. त्या सर्वांवर विश्‍वास ठेवता येत नाही. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या हत्यारामधून खरोखरच गोळी झाडली गेली आहे का ?, यासाठी हत्यार पडताळणीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यात आले आहे. त्याविषयीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य पुढे येईल, असा निर्वाळा आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख कुलकर्णी यांनी दिला.

तपास यंत्रणांच्या या ‘कामगिरी’विषयी प्रसारमाध्यमे काहीच का बोलत नाहीत ?

श्री. सुधन्वा गोंधळेकर यांच्यासमवेत काम करणारे श्री. महेश इंदलकर आणि श्री. विशाल खुटवाल या २ कर्मचार्‍यांना ३ दिवस डांबून खोटी साक्ष देण्यासाठी मारहाण करण्यात आली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढील वक्तव्ये करून आतंकवादविरोधी
पथकाचे अन्वेषण एक प्रकारे कसे दिशाभूल करणारे आहे, हेच स्पष्ट केले !

वैभव राऊतला पकडल्याने तपासाची दिशा पालटली आहे. त्यामुळे आता तावडे यांच्या संदर्भातील साक्षी पालटतील का ?, हे सांगता येत नाही. ५ वर्षांत या खटल्यात काही विश्‍वासपूर्ण होत नाही. नवीन नवीन नावे तपासात येतात. नवीन माणसे येतात, जुनी माणसे गायब होतात. हे जर खरे आरोपी असतील, तर स्वागत आहे; पण कोणी खरा सूत्रधार लपवण्यासाठी कुणाला पुढे केले जात आहे का, याची दाट शंका येते. प्रतिदिन नव्या ‘थिअरी’ येतील कि काय याची शंका वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात