हिंदुत्वनिष्ठ आणि नक्षल समर्थक यांच्या संदर्भात पोलीस, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आदींची दुटप्पी भूमिका !

मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रातील ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक केली. हे प्रकरण ताजे असतांना अलीकडेच पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या ‘थिंक टँक’मधील ५ सदस्यांना अटक केली. खरेतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेने या दोन्ही घटनांना एकाच दृष्टीने पहायला हवे होतेे; मात्र तसे झाले नाही. वृत्तांकन करतांना हिंदुत्वनिष्ठांना ‘आतंकवादी’, तर नक्षलप्रेमींना ‘कथित’ असे संबोधण्यात आले. या दोन्ही घटना आणि वृत्तांकन यांत लक्षात आलेला भेद पुढे देत आहोत.

 

कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर येथील
‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थे’तील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या
नावे असलेल्या ४५ लक्ष ५१ सहस्र ३५२ रुपयांच्या बेहिशोबी रकमेचे गूढ

कॉ. गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर येथील ‘श्रमिक नागरी सहकारी पतसंस्थेत’ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लक्ष ५१ सहस्र ३५२ रुपयांची बेहिशोबी रक्कम ठेवली आहे. भाकपने या लक्षावधी रुपयांचा कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या काळ्या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय अन् केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याद्वारे करावी. हा पैसा एकतर काळा पैसा असेल अथवा देणगी, खंडणी या माध्यमातून पतसंस्थेत जमा होऊन या तिन्हीपैकी एका कारणावरून कॉ. पानसरे यांची हत्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या बेहिशोबी रकमेची चौकशी करून या प्रकरणाचे संपूर्ण अन्वेषण करावे आणि कॉ. पानसरे, दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या खुनांच्या मागील कारण आर्थिक अपव्यवहार आणि नक्षलवाद्यांशी संबंध तर नाही ना, या दृष्टीने शासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी कोल्हापूर येथे १२ सप्टेंबर २०१७ ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती.

(नुकत्याच पुणे पोलिसांनी नक्षलप्रेमींवर केलेल्या कारवाईतून त्यांचा पंतप्रधान मोदी यांना ठार मारण्याचा आणि त्यांचे सरकार उलथवण्याचा डाव समोर आणला. अशा गोष्टींसाठी पैशाची आवश्यकता असते आणि असा पैसा नक्षलप्रेमींचे हिंतचिंतक त्यांना पुरवत असणार, अशी शंका येतांना ही बेहिशोबी संपत्ती त्यातलाच एक प्रकार तर नाही, अशीही शंका निर्माण होते !  – संपादक)

 

कसाबच्या फाशीला विरोध करणारे आणि हिंदु धर्मावर
चिखलफेक करणारे कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे !

२६/११ च्या मुंबई आक्रमणाचा आरोपी अजमल कसाब याला अनेक वर्षांनंतर फाशी देण्याचा निर्णय झाला. न्यायालयाच्या या आदेशाचा विरोध करणार्‍यांमध्ये कॉ. गोविंद पानसरेदेखील होते. ‘शिवाजी हिंदूंचा हृदयसम्राट नाही. तो एक संधीसाधू होता’, असे म्हणणे पुस्तकात मांडून प्रसिद्ध केलेले कॉ. पानसरे अलीकडे ‘कसाब निर्दोष असल्याचे म्हणत त्याचा मृत्यूदंड रहित व्हावा’ म्हणून रस्त्यावर उतरतात, यात आश्‍चर्य काहीच नाही. कसाबचे समर्थन करण्यासाठी कॉ. पानसरे यांना असलेले दुःख कोणते ?

 

गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांना पकडण्याची मागणी करणारे आता कुठे ?

‘गौरी यांचे मारेकरी शेवटी तरी सापडतील का ?’, असे विचारल्यास स्पष्टपणे ‘नाही’, हेच उत्तर ! कारण की मारेकर्‍यांना धरायचे असते, तर अन्वेषण यंत्रणांनी नक्षल भागात जाऊन त्यांना पकडले असते. गेल्या एक-दीड वर्षात शरण येऊन देशात पोलिसांकडून बंदी झालेल्या काहींना तोंड उघडायला लावल्यास हत्यारे कोण, हे समजेल. असे चातुर्याने केलेले अन्वेषण सरकारला बुमरँगसारखे उलटेल म्हणून ती एक दिशा सोडून उरलेले सर्व काम केले जात आहे. ही धूळफेक आणखी किती दिवस चालणार ? राज्याच्या अन्वेषणावर कोणालाच विश्‍वास नाही. ‘अन्वेषणाचे दायित्व ‘सीबीआय’ला सोपवावे’, असे म्हणणारे गौरी हिचे बहीण-भाऊ आता कुठे आहेत ? ‘गौरी यांच्या मारेकर्‍यांना पकडून द्या’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी लोक आता कुठे आहेत ? या सर्वांना कोणकोणते ‘विटॅमिन’ देऊन गप्प बसवण्यात आले आहे, हे कर्नाटकच्या प्रज्ञावंत लोकांना ठाऊक नाही का ? गौरी यांचा आत्मा खरोखर हे सर्व पहात असल्यास ‘अरे असल्यांना मी माझे समजत होते ना ?’, असे म्हणत तडफडत असेल !’

 

पंतप्रधानांना ‘गाढव’ म्हणणार्‍या गौरी लंकेश यांच्या बौद्धिकतेची पातळी !

काही राष्ट्रीय स्तरावरची इंग्रजी नियतकालिके गौरी लंकेश यांना आणखी एक पायरी वर चढवून त्यांना ‘पंतप्रधान पसरवत असलेल्या हिंदुत्वाच्या खोट्या बॉम्बपुढे छातीठोकपणे उभे रहाण्याचे धाडस असलेले व्यक्तीमत्त्व’ म्हणून रंगवत आहेत. मोदी यांच्या एका केसाशीही समानता दर्शवणारे तिचे व्यक्तीमत्त्व नव्हते. मोदी यांना ‘यू इडियट मोदी’ अथवा ‘मोदी एक गाढव’ असे चिडवणे सोडून गौरी यांच्यामध्ये पत्रकारात अपेक्षित असा कोणताही गुण कणभर नव्हता. ‘मोदी यांना ‘नॅपकीन’ पाठवायची चळवळ करूया’, असे कोणत्यातरी आंदोलनाच्या संदर्भात ठरवल्यावर ‘नवीन नॅपकीन कशाला ? आपण वापरून जुने झालेले टाकाऊ नॅपकीन पाठवूया’, असे गौरी म्हणाल्या होत्या. ही होती त्यांच्या बौद्धिकतेची पातळी !

संदर्भ : सनातन प्रभात