लोकप्रतिनिधींचा विरोध आणि खंडण

हिंदुविरोधी पक्षांच्या नेत्यांचे सनातनद्वेषी फुत्कार !

डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या आणि आता नालासोपारा प्रकरण !

या सर्व प्रकरणांमध्ये अन्वेषण पूर्ण होण्यापूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांनी सनातनच्या नावाने कोल्हेकुई चालू करून अन्वेषण भरकटवले; आता तेच नेते ‘सनातनचेच नाव का येते ?’, असा प्रश्‍न करत आहेत. याविषयी सनातन संस्थेने वेळोवेळी प्रसिद्धी पत्रकांद्वारे प्रसिद्ध केलेली तिची भूमिका जाणून न घेता, तसेच नालासोपारा प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचे अटकसत्र चालू असतांना कोणतेही अन्वेषण होण्याची औपचारिकता न ठेवता थेट ‘सनातन संस्थे’चे नाव घेतले गेलेे, लगेच ‘सनातनवर बंदीची घाला’, अशी मागणी केली गेली. या प्रकरणी गृहराज्यमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सरकारने या प्रकरणी ‘सनातन संस्थे’चे नाव घेतलेले नाही. तरीसुद्धा जाणीवपूर्वक सनातन संस्थेला लक्ष्य करून बंदीची मागणी काही उतावीळ राजकीय पक्षांच्या दायित्वशून्य नेत्यांकडून केली जात आहे. एरव्ही संविधानाचा गजर करणारे नेते आता घटनात्मक प्रक्रिया पूर्ण होण्यास का वाट पहात नाहीत ?, असा प्रश्‍न पडतो !

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सनातनद्वेषातून केलेले आरोप !

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल, तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आणि पुढे त्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांची भेट घेतली; मात्र त्यांनी सनातन संस्थेचा हात असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे सांगितले.

मानवजातीच्या उत्कर्षाचा विचार करणारे परात्पर गुरु
डॉ. आठवले यांच्यावर असा आरोप करणे, हा तर सूर्यावर थुंकण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

वास्तविक विखे पाटील ज्या पक्षात कार्यरत आहेत, त्या पक्षाचा आणि त्यांचा इतिहास पहाता त्यांना असे आरोप करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ? सनातनवर आरोप करून प्रसिद्धी मिळवू पहाणारे विखे पाटील यांच्यासारखे राजकारणी लोकशाही कलंकित करतात !

 

काँग्रेसच्या उतावीळ नेत्यांकडून मागणी

‘सनातनवर बंदी घाला’ आणि ‘सनातनच्या प्रमुखांना अटक करा !’

अनाचारी काँग्रेसवाल्यांची अशी मागणी हास्यास्पद !

काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठीच आहे.

 • ‘सनातनवर बंदी घाला’ आणि ‘सनातनच्या प्रमुखांना अटक करा !’
 • अनाचारी काँग्रेसवाल्यांची अशी मागणी हास्यास्पद !
 • काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठीच आहे.
 • या पापांसाठी काँग्रेसी प्रमुख राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना अटक करावी का ?
 • या पक्षातील महासचिव दिग्विजय सिंह हे आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांना आलिंगन देऊन त्यांच्या व्यासपिठावर जातात…
 • डॉ. झाकीर नाईक यांच्याकडून ५० लाख रुपयांचे साहाय्य काँग्रेसला केले जाते…
 • पंजाबमधील काँग्रेसी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू भारतावर आक्रमण करणार्‍या पाकिस्तानी सैन्यप्रमुखांची गळाभेट घेतात…
 • पाकिस्तानात जाऊन भारतातील शासन पालटण्याची लाचार आणि देशद्रोही मागणी करणार्‍या मणिशंकर अय्यरांची जी काँग्रेस ‘घरवापसी’ करून घेते…
 • यांच्या मणीपूर काँग्रेस आमदाराच्या घरी पोलीस मुख्यालयातून चोरीला गेलेली शस्त्रास्त्रे सापडतात…
 • बोफोर्सपासून आदर्श घोटाळ्यापर्यंत ज्या काँग्रेसचे मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत…
 • दिग्विजय सिंह आणि जयराम रमेश नक्षलप्रेमींना साहाय्य करत असल्याचा आरोप आहे…

(विस्तारभयास्तव ही सूची संपवत आहे.)

या पापांसाठी काँग्रेसी प्रमुख राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना अटक करावी का ?

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात