‘सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी हे षड्यंत्र !’ …असे आम्ही म्हणतो, ते याचसाठी…

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाला ५ वर्षे पूर्ण होत असतांना सनातन संस्था हाच एकमेव अन्वेषणाचा केंद्रबिंदू मानून परत नव्याने अन्वेषण चालू झाले. त्यात कोणताही पुरावा सिद्ध झालेला नसतांना माध्यमांमधून सनातन संस्थेला दोषी ठरवून प्रश्‍नांचा भडीमार केला गेला; मात्र त्या तुलनेत सनातनची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे षड्यंत्र कसे आहे, ते खाली दिले आहे.

 

या तर डॉ. दाभोलकर स्मृतीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर
पुरो(अधो)गाम्यांना शांत करण्यासाठी केलेल्या कारवाया !

२० ऑगस्ट या दिवशी डॉ. दाभोलकर यांचा स्मृतीदिन असल्याने अंनिस आणि पुरो(अधो)गामी याचा लाभ उठवत हिंदुत्वनिष्ठांवर तुटून पडल्या अन् हिंदुत्वनिष्ठांना पाठीशी घालण्याचा आरोप शासनकर्त्यांवर करत त्यांना दूषणे दिली अन् अर्थातच माध्यमे त्यांची ‘री’ उचलून सरकारला जाब विचारत होती. पुरोगामी आणि माध्यमे यांच्याद्वारे सरकारवर नेहमीप्रमाणे एकप्रकारे दबावतंत्रांचा वापर केला जातो आणि हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करण्यासाठी वातावरणनिर्मिती केली जाते. गेली ५ वर्षे असेच घडत आहे. त्यामुळे ‘पुरो(अधो)गाम्यांच्या दबावापोटीच आतापर्यंत दाभोलकर आणि पानसरे प्रकरणात वेगवेगळ्या अनेक संशयास्पद आरोपींना पकडण्यात येऊनही या वर्षी परत वेगवेगळ्या व्यक्तींना पकडण्यात येत आहेे’, अशीच चर्चा हिंदुत्वनिष्ठांमध्ये आहे. या आरोपात चूक ते काय ? कारण गत ५ वर्षांत खरा खुनी पोलीस का शोधू शकले नाहीत ?, हा प्रश्‍न रहातोच !

 

सनातनवर बंदीची मागणी म्हणजे हिंदुत्वनिष्ठ आणि
त्यांच्या संघटना यांना संपवण्याच्या साम्यवाद्यांच्या षड्यंत्राचाच भाग !

गेली अनेक वर्षे भारतात डाव्या चळवळीतील नेत्यांनी पुरो(अधो)गामी, समाजवादी कार्यकर्ते यांचा बुरखा ओढून समाजात साम्यवादी विचार पसरवण्याचे कार्य केले. त्यांचा शहरी नक्षलवाद आता कुठे उघड होत चालला आहे; मात्र या मंडळींचे सगळ्यात मोठे शत्रू होते हिंदुत्वनिष्ठ ! बंगाल, केरळ, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या घडवून हिंदु संघटनांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला ! ते शक्य न झाल्याने आता हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवून या संघटनांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातूनच डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर पहिली मागणी कोणती करण्यात आली, तर ती म्हणजे ‘सनातनवर बंदी घाला !’ या प्रकरणात ५ वर्षे होऊनही अन्वेषणही पूर्ण झालेले नाही, पुरावे समोर आलेले नाहीत, न्यायालयाने कोणालाही दोषी ठरवलेले नाही, असे असतांना ‘सनातनवर बंदी घाला’, अशी मागणी मात्र सातत्याने रेटून धरली जात आहे.

 

हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे कार्य रोखण्यासाठीचे षड्यंत्र !

हिंदु जनजागृती समिती ही समाजात धर्मशिक्षण देऊन हिंदूसंघटनाचे कार्य करते. यामुळे विविध विचारसरणी, कार्यपद्धती असणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जात आहे. यामुळे देशभरातील संघटना जोडल्या जात आहेत. हिंदूंचे प्रभावी संघटन उभे राहून आज हिंदूंवरील अन्यायाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे रहात आहे. यामुळे हिंदुविरोधी शक्ती हे कार्य बंद पाडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला लक्ष्य करत आहेत, असेच यावरून दिसते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात